Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सहा साखर कारखान्यांकडे अद्यापही ५० कोटी ‘एफआरपी’ थकित

Sugarcane Factory : पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही १५ जुलैअखेर सहा कारखान्यांकडे अद्यापही ४९.८५ कोटी रुपयांची एफआरपी थकित आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील २०२३-२४ चा ऊस गाळप हंगाम संपून, पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही १५ जुलैअखेर सहा कारखान्यांकडे अद्यापही ४९.८५ कोटी रुपयांची एफआरपी थकित आहे.

दरम्यान, या हंगामात जिल्ह्यातील सात कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने आरआरसी कारवाई केली होती. त्यापैकी तीन कारखान्यांनी १५ जुलैअखेर पूर्ण एफआरपी दिली असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

यंदा जिल्ह्यातील ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये एक कोटी ६८ लाख ४६ हजार ७५१ मेट्रिक टन गाळप होऊन ९.४६ टक्के सरासरी साखर उताऱ्याने एक कोटी ५९ लाख ३२ हजार ९०२ क्विंटल साखर उत्पादन झाले होते.

गाळप झालेल्या उसाचे १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार २२१ कोटी रुपये ऊसबिलाच्या स्वरूपात मिळाले आहेत. जिल्ह्यातील ३६ पैकी ३० कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे.

कारखानानिहाय थकित एफआरपी (कोटींत)

थकित एफआरपी थकलेल्या कारखान्यात सिद्धेश्‍वर कारखान्याकडे ६ कोटी एक लाख, मातोश्री-१४ कोटी ५५ लाख रुपये, जयहिंद- सात कोटी ८७ लाख रुपये, विठ्ठल रिफाइंड- १० कोटी ९० लाख रुपये, भीमा ९ कोटी ८४ लाख रुपये, आदिनाथ- ६८ लाख रुपये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT