Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture award : धुळ्यातील ५ शेतकऱ्यांना शासनाकडून ‘कृषी पुरस्कार’

Agriculture Department : महाराष्ट्र शासनाकडून २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Dhule News : महाराष्ट्र शासनाकडून २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील पाच व्यक्तींना कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधव व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न , वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडित, युवा शेतकरी,

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्रदान करून शेतकरी, संस्था यांचा सन्मान करण्यात येतो. यात धुळे जिल्ह्यातील पाच व्यक्तींना पुरस्कार घोषित झाले.

पुरस्कारार्थी असे

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट)साठीचा पुरस्कार वसंतराव भिकनराव साळुंखे (मु. पो. मुकटी, ता. जि. धुळे) व महेंद्र निंबा परदेशी (मु. पो. कुसुंबा, ता. जि. धुळे) यांना २०२० या वर्षातील पुरस्कार जाहीर झाला. २०२१ या वर्षासाठी दिनेश नारायण माळी (मु. पो. बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

तसेच २०२२ या वर्षासाठी यशवंत निंबा महाजन (मु. पो. बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांना पुरस्कार जाहीर झाला. त्याप्रमाणे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार २०२० या वर्षासाठी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय अरविंद बोरसे यांना जाहीर झाला, असे नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT