Farmer Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटींची मदत

Revenue and Forest Department Update : जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ हजार ८३८ शेतकऱ्यांना पाच कोटी ९४ लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागाने शासननिर्णय काढला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ हजार ८३८ शेतकऱ्यांना पाच कोटी ९४ लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागाने शासननिर्णय काढला आहे. असे असले, तरी अवकाळीमुळे यंदा कपाशीचे केवळ ५५ ते ६० टक्के उत्पादन येण्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला असला तरी काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या घटनाही घडल्या. ज्या भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्या भागाचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.

या नुकसानीमुळे जिल्ह्यातील केळी, कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यां‍च्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. दरम्यान, राज्य शासनाकडे नुकसानभरपाईसाठी निधी मागणीचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता.

शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा

जळगाव जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे तब्बल आठ हजार ८३८ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाच हजार १४४ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी पाच कोटी ९४ लाखांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत तोकड्या स्वरूपाची असली तरी काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

वादळी पावसाने प्रचंड नुकसान

जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थितीतून सावरत नाही तोच अवकाळी पावसाचा झटकाही शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यांतील एक हजार १२६ शेतकऱ्यांचे ५५२ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या मदतीची शासनाकडून अपेक्षा आहे.

यंदा कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जूनमध्ये झालेल्या उशिराच्या पावसाने व नंतर महिनाभराच्या दडीने कपाशीचे उत्पादन अतिशय कमी आले आहे. त्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे हाती येणारे संभाव्य कापसाचे उत्पादन काही किलोवर येणार आहे.
किशोर पाटील, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LPG Price Hike Protest: गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Sugarcane Crop Disease: उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ रोगाचे नियंत्रण

Summer Groundnut Cultivation: अकोल्यात उन्हाळी भुईमूग लागवड दिलासादायक

Minister Dr. Pankaj Bhoyar: वेतनेतर अनुदान धोरणाचे पुनर्विलोकन करण्याचे प्रस्तावित

SCROLL FOR NEXT