Lumpy skin disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin : सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ बाधित ४६७ जनावरे

Lumpy skin disease : सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी नव्याने माळशिरस तालुक्यात पाच आणि मंगळवेढ्यात तीन अशी आठ जनावरे ‘लम्पी’बाधित आढळली आहेत. सध्या जिल्ह्यात ४६७ लम्पीबाधित जनावरे आहेत.

Team Agrowon

Lumpy skin Solapur News : सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी नव्याने माळशिरस तालुक्यात पाच आणि मंगळवेढ्यात तीन अशी आठ जनावरे ‘लम्पी’बाधित आढळली आहेत. सध्या जिल्ह्यात ४६७ लम्पीबाधित जनावरे आहेत.

पण एकूणच गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ७४२ जनावरांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी ३७ हजार ३६३ पशुधन लम्पीमुक्त झाले, तर ३ हजार ९९२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या पशुधनापैकी ३ हजार ५१० पशुपालकांना आतापर्यंत ८ कोटी ३७ लाख ४६ हजार रुपयांची मदतवाटप करण्यात आली आहे.

सध्या २५९ प्रस्ताव प्रलंबित असून, या माध्यमातून ७३ लाख २५ हजार रुपये त्यांना देण्यात येणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने यापुढेही लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

लसीकरण आणि जनावरांची तपासणी मोहीमही राबवण्यात येत आहे. असे असले तरी मंगळवेढा आणि माळशिरसमध्ये दोनच दिवसांपूर्वी आठ जनावरे पुन्हा बाधित आढळली, पण एकूणच लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याचे चित्र आहे.

माढा ‘लम्पी स्कीन’मुक्त

सध्या जिल्ह्यात असलेल्या ४६७ लम्पीबाधित जनावरांमध्ये अक्कलकोट तालुक्यातील ४६, मंगळवेढ्यातील ८०, मोहोळ तालुक्यात ८८, पंढरपुरात ४८, सांगोला तालुक्यात ५०, दक्षिण सोलापुरात ९८, उत्तर सोलापुरात २०, माळशिरसमध्ये २०, करमाळ्यात १० आणि बार्शी तालुक्यातील ७ जनावरांचा समावेश आहे. तर माढ्यात मात्र एकाही लम्पीबाधित जनावराची नोंद नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम

SCROLL FOR NEXT