Memorandum of Understanding Agrowon
ॲग्रो विशेष

Memorandum of Understanding : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ४६६१ कोटींचे सामंजस्य करार

District Level Investment Council : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या २४१ उद्योग घटकांसोबत ४६६१ कोटीचे सामंजस्य करार करण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील मासिआचे श्रीमती रत्नमाला बाळासाहेब पवार सभागृह, चिकलठाणा, एमआयडीसी, येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२४ चे आयोजन शनिवारी (ता. ९) करण्यात आले होते. या परिषदेमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या २४१ उद्योग घटकांसोबत ४६६१ कोटीचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारामुळे जिल्ह्यामध्ये सुमारे १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

या परिषदेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्वप्नील राठोड, सहायक आयुक्त, रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील उपस्थित होते.

उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी उद्योग विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती देऊन उद्योजकांना त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. शासनाच्या नवीन आयटी धोरणा बाबत माहिती देण्यास आली.

या परिषदेदरम्यान भरीव आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत औद्योगिक विकासाला चालना आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी चेतन गिरासे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत उद्योजकांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते सामंजस्य कराराच्या प्रति प्रदान करण्यात आल्या.

उद्योग क्षेत्रातील निर्यातसंधी या विषयावर विनोदराय इंजिनियर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक, सुनील रायथत्ता यांनी मार्गदर्शन केले. अमोल मोहिते यांनी निर्यात क्षेत्रातील ट्रेंड आणि जिल्ह्यात उपलब्ध निर्यात संधी याबाबत मार्गदर्शन केले. मॅजिकचे संचालक प्रसाद कोकीळ यांनी नाविन्यता आणि उद्योजकता यासाठी कार्यरत असलेल्या स्टार्ट अप इंडिया आणि अटल टिकरिंग लॅब या माध्यमातून कार्यरत असल्याचे सांगितले. मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, बी-मटचे अध्यक्ष मिलिंद थोरात यांनी आपले मत यावेळी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease: उन्हाळ्यात टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांसाठी ३ सोपे उपाय

Sugarcane GPS Survey: उत्तर प्रदेशात ऊस पिकाचे जीपीएस सर्वेक्षण, शेतकऱ्यांना 'एसएमएस'द्वारे माहिती, अनेक फायदे मिळणार

Crop Insurance Delay: पीक विमा तत्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

World Veterinary Day: पशुवैद्यकीय सेवांमुळेच पशुधन सुरक्षित

Farmer Protest: आंबा, काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा

SCROLL FOR NEXT