Canal Leakage Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

Niphad Canal Leakage : मे व जूनच्या पावसामुळे व या गावांलगत असलेले गोदावरी डावा व मराठवाडा एक्स्प्रेस हे दोन्हीही कालवे सलग ४५ दिवस सुरू राहिल्याने पाणीगळती होऊन भूजल पातळी अधिक झाल्याने या जमिनी नापिक झाल्या आहेत.

Team Agrowon

Nashik News : सततचा पाऊस आणि गोदावरी डावा कालवा, मराठवाडा एक्स्प्रेस कालवा हे सलग ४५ दिवस सुरू राहिल्याने निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, कोळगाव, रुई, कानळद, देवगाव, शिवारातील शेतजमिनी नापिक झाल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या भागाचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

मे व जूनच्या पावसामुळे व या गावांलगत असलेले गोदावरी डावा व मराठवाडा एक्स्प्रेस हे दोन्हीही कालवे सलग ४५ दिवस सुरू राहिल्याने पाणीगळती होऊन भूजल पातळी अधिक झाल्याने या जमिनी नापिक झाल्या आहेत. पाटबंधारे व जलनिस्सारण विभागाच्या निष्काळजीपणामुळे कालव्यातील पाण्याच्या गळतीमुळे शेतजमिनी नापिक झालेल्या आहेत.

पाटबंधारे विभागाने या कालव्यांच्या पाण्याच्या गळतीबाबत कुठल्याही प्रकारचे नियोजन तसेच उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे परिसरातील वर नमूद गावांच्या शिवारातील शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करणे अशक्य झालेले आहे.

तसेच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचेदेखील या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. पेरणी लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पेरणी होईल याची शाश्वती नाही. परिसरातील हजारो हेक्टर शेती नापिक झालेली असून, यास पाटबंधारे विभाग जबाबदार असून, नापिक जमिनींचे पंचनामे करून त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात याकरिता संबंधित विभागांना आदेश देण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन

निवेदनानंतर कार्यवाही न झाल्यास पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, गजानन घोटेकर, अनिल घोटेकर, धर्मराज घोटेकर, केदारनाथ घोटेकर, रवींद्र घोटेकर, विनायक वाघ, संतोष घोटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT