Dairy Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Industry : ‘वारणा’च्या उलाढालीत ४०० कोटींची वाढ; पुढील वर्षी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार

Dairy Farming : डॉ. कोरे म्हणाले, की वारणा आणि गावातील सहकारी संस्थांमध्ये करार करण्यात येऊन सभासदाने पुरवठा केलेल्या दूधाची नोंद संघाच्या कार्यालयात होईल.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

वारणानगर, जि. कोल्हापूर : वारणा दूध संघाची गतवर्षीच्या तुलनेत अहवालसालात ४०० कोटींची वाढ होऊन १३८९ कोटींची उलाढाल झाली. फरकबिल नको असलेल्या म्हैस दुधास प्रतिलिटर ३ रुपये, फरकबिल हवे असलेल्या दूध उत्पादकांना १ रुपयाची दरवाढ करणार असल्याची घोषणा अध्यक्ष डॉ. आमदार विनय कोरे यांनी केली.

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या ५५ व्या वार्षिक सभेत डॉ. कोरे बोलत होते. ते म्हणाले, की वारणाने दूध उत्पादकांना दूध दराबरोबरीने विविध सवलती, फरकबिलासारखे लाभ दिले आहेत.

सहकारी तत्त्वावरील संस्था मोडीत काढण्याचा बाहेरील कंपन्या जादा दराचे आमिष दाखवून कुटील डाव करीत आहेत. यावर पर्याय म्हणून वारणा ज्या म्हैस दूध उत्पादकांना फरकबिल नको आहे त्यांना प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ तर ज्यांना फरकबिल हवे आहे त्यांना १ रुपयाची वाढ आणि फरकबिल २ रुपये ५० पैसे देण्यात येईल.

(Agro Special)

डॉ. कोरे म्हणाले, की वारणा आणि गावातील सहकारी संस्थांमध्ये करार करण्यात येऊन सभासदाने पुरवठा केलेल्या दूधाची नोंद संघाच्या कार्यालयात होईल. त्यामुळे संस्थाच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात येणार आहे.

संघास ५५ कोटींचा नफा झाला आहे. म्हैस दुधास प्रतिलिटर २ रुपये ५० पैसे, गाय दुधास १ रुपये फरकबिल दिले जाणार आहे. भारतीय संरक्षण दलात ३४ कोटींची दूध विक्री झाली असून २ लाख दूध उत्पादकांना आधार देणारा वारणा दूध संघ आहे. पुढील वर्षी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून इस्ट इंडिया कंपनीप्रमाणे काही संस्थांनी सहकाराला गिळंकृत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ते मोडून काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.

नॅशनल कोऑप डेरी फेडरेशन ऑफ इंडियाचे (आनंद) कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा, व्यवस्थापक अविनाश धुले, वारणा दूध संघाचे विक्रेते मंजीव आग्रवाल, भारतीय रेल्वेचे वारणाचे राष्ट्रीय वितरक अमित कामत, आंध्र प्रदेशातील दुग्ध व्यवसायातील उद्योजक हर्षा ग्रांधी यांच्यासह वारणा दूध संघातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दूध उत्पादक, संस्था, गोठेधारकांना सन्मानित करण्यात आले.

वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बॅकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, ए. डी. शिंदे आणि कंपनीचे चाटर्ड अकाउंटट रणजीत शिंदे, अमर पाटील, संघाचे संचालक व वारणा समूहातील संचालक, सभासद उपस्थित होते. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले. शितल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT