Sugarcane Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : उसाच्या लागवडीत ४० हजार हेक्टर घट

Sugarcane Production : गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली, पूर्वहंगामी व खोडवा ऊस लागवडी ठप्प आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली, पूर्वहंगामी व खोडवा ऊस लागवडी ठप्प आहेत. पुणे विभागात आत्तापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या तीन लाख २ हजार ७७९ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. त्यातच सध्याचा ऊस चाऱ्यासाठी जाणार असल्याने साखर कारखान्यांचा पुढील गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यातच ऑक्टोबरमधील कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडी कमी प्रमाणात झाल्या. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे.

पाणी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. विभागात सरासरीच्या तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टरपैकी तीन लाख २ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० हजार ६१३ हेक्टरने ऊस लागवडी घटल्या आहेत.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामांत ऊस लागवडी करतात. दरवर्षी बहुतांश शेतकरी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करतात. पूर्वहंगामी उसाच्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत करतात.

तर १५ जानेवारी १५ फेब्रुवारी या काळात सुरू उसाच्या लागवडी शेतकरी करतात. परंतु याच काळात पाणीटंचाई सुरू झाल्याने सुरू उसाच्या अवघ्या १८ हजार ६२६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. आतापर्यंत जवळपास एक लाख २४ हजार ३१२ हेक्टर खोडवा ऊस शेतकऱ्यांनी ठेवला आहे.

यंदा पुणे विभागात आडसाली उसाची एक लाख ८ हजार ९६ हेक्टरवर, पूर्वहंगामाची ५१ हजार ७४५ हेक्टर ऊस लागवड केली आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांत बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळ या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत.

आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टर)

जिल्हा सरासरी क्षेत्र लागवड

नगर ९४,६९३ ९०,०४४

पुणे १,१७,०७१ ९९,२०७

सोलापूर १,३१,६२८ १,१३,५२९

एकूण ३,४३,३९२ ३,०२,७७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT