Vegetable Market Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : भाजीपाल्‍याच्या घाऊक दरात ४० टक्‍के वाढ

Vegetable Rate : राज्यातील बहुतांश भागात झालेल्‍या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

Team Agrowon

Washi News : राज्यातील बहुतांश भागात झालेल्‍या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. एमपीएमसीतील आवक कमी झाल्याने घाऊक दर जवळपास ४० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. अवकाळीचा फटका, त्‍यात वाहतूक खर्चही निघत नसल्‍याने एमपीएमसीत भाजीपाला पाठवणे परवडत नसल्‍याचे काही शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे. किरकोळ बाजारातही भाज्‍यांचे दर दुप्पटीने वाढल्‍याने गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.

नवी मुंबईतील एपीएमसीत दरदिवशी भाजीपाल्‍याच्या ६०० ते ६५० गाड्या येतात. सोमवारी भाज्यांच्या एकूण ५२२ गाड्यांची आवक झाली. ज्यामध्ये केवळ ३२ मोठ्या वाहनांचा समावेश आहे. भाज्यांचे कमी उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी एपीएमसीत भाजीपाला पाठवण्याऐवजी थेट ग्राहकांना विकण्यास प्राधान्य देत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी १५ ते २० रुपये किलोने मिळणारी वांगी आता २४ ते ३५ रुपये किलोने विकली जात आहे. तर २० ते ४५ रुपये किलोने मिळणारी भेंडी आता ४५ ते ५० रुपयांना मिळत आहे. गवार ६० रुपयांना तर पडवळ ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहे.

बदलते हवामान आणि अवकाळीचा फटका भाज्यांना बसल्याने आवक घटली. भाज्यांचा नवीन हंगामासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. तोपर्यंत दर तेजीतच राहतील.
रामचरण कहार, विक्रेते, एपीएमसी
बाजारात भाज्यांचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच उत्पन्न कमी, त्यात कापणी आणि वाहतुकीचा खर्च पाहता शेतकऱ्यांना भाज्यांची अगदी कवडी मोल किंमत मिळत आहे.
उल्हास पाटील, शेतकरी, नाशिक
भाज्‍यांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. काटकसर करून घरखर्च भागवण्याचा प्रयत्न आहे. परंतु, वाढत्या किमतींमुळे भाज्‍या खरेदी करताना बजेट चांगलेच कोलमडते.
प्रिया पाटील, गृहिणी, कोपरखैरणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Prices : चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅक्टरच्या किंमती स्थिर राहणार; विक्रीवर मात्र एल-निनोचं सावट

Agriculture Fair: कृषी अभियांत्रिकी विभागात प्रात्यक्षिक मेळाव्याला प्रतिसाद

Agriculture Electricity: मोठा दिलासा! १२५ गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज

Unseasonal Rain: पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीचा घाटनांद्रा परिसराला तडाखा

Unseasonal Rain: राज्याला अवकाळीचा तडाखा, १,४०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

SCROLL FOR NEXT