Sugar Factory Agorwon
ॲग्रो विशेष

Solapur Sugar factory FRP : सोलापुरातील सहा कारखान्यांनी थकवले ४० कोटी; बिलांसाठी ऊस उत्पादकांच्या चकरा

Solapur Sugar factory : सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफआरपीचे ४० कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिलासाठी कारखान्यांच्या चकरा माराव्या लागत आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफआरपीचे ४० कोटी रूपये अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे यंदाचा हंगाम सुरू होण्याआधी तरी ऊस बिलाचे पैसै मिळणार का? असा सवाल हजारो शेतकऱ्यांनी केला आहे. मातोश्री लक्ष्मी शुगर, भीमा सहकारी साखर कारखाना, जयहिंद शुगर प्रा. लि, विठ्ठल रिफायनरी पांडे करमाळा, श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, आदिनाथ सहकारी साखर कारखाना या कारखान्यांनी मागील हंगामाचे पैसे दिलेले नाहीत.

यंदाचा गळीत हंगाम तोंडावर आला असतानाही सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या गाळप हंगामतील पैसे दिले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदील झाला असून ऊस बिलासाठी कारखान्याच्या चकरा मारत आहे. तर गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील साखर राज्यात सर्वाधिक गाळप करण्याचा उचांक केला होता.

पण गाळप केलेल्या ३७ कारखान्यांपैकी करमाळ्याचा आदिनाथने केवळ ६० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला होता. तर इतर ३६ कारखान्यांनी उसाचे गाळप उसाच्या गणितावर केले होते. मात्र गाळप उचांक करणाऱ्या जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. कारखान्यांचा गाळप हंगाम मार्च महिन्यात आटोपला असून कारखाने बंद होऊन पाच ते सहा महिने झाले आहेत. मात्र साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे नाव घेत नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिले आहेत. तर याआधी थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोलापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचे बिलं अडकली आहेत.

कारखाने आणि थवलेली रक्कम

१) मातोश्री लक्ष्मी शुगर - १४ कोटी ५५ लाख

२) भीमा सहकारी साखर कारखाना - १० कोटी

३) जयहिंद शुगर प्रा. लि - ८ कोटी

४) विठ्ठल रिफायनरी पांडे करमाळा - ४ कोटी २६ लाख

५) श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना - २ कोटी

६) आदिनाथ सहकारी साखर कारखाना - ६३ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT