Ujani Dam Water Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : एका दिवसात ‘उजनी’तील पाणीसाठ्यात ४ टक्के वाढ

Ujani Dam Water Level : ‘उजनी’कडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात रविवारी (ता. १) पुन्हा वाढ करण्यात आल्याने धरणातील पाणीपातळीचा वेग वाढला आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘उजनी’कडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात रविवारी (ता. १) पुन्हा वाढ करण्यात आल्याने धरणातील पाणीपातळीचा वेग वाढला आहे. रविवारी (ता. १) सकाळी धरणातील पाणीपातळी ३६ टक्क्यांवर पोहोचली. पाण्याचा वेग असाच राहिला. तर येत्या दोन-तीन दिवसांत धरण ५० टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्याशिवाय धरणाच्या कार्यक्षेत्रात अधून-मधून पाऊस पडतच आहे. त्यामुळे उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी-जास्त होत असला, तरी अखंडपणे सुरूच आहे.

त्याचा फायदा धरणातील पाणीपातळी वाढीस होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून १५ हजार २९० क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये येत होता. पण आता त्यात रविवारी पुन्हा वाढ करण्यात आली असून, विसर्ग २२ हजार ९३ क्युसेक इतका वाढविण्यात आला आहे.

त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. शनिवारी (ता. ३०) धरणातील पाणीपातळी ३२.५ टक्क्यांवर होती. पण पाण्याच्या अखंड विसर्गामुळे गेल्या २४ तासांत तब्बल चार टक्क्यांनी पाणीपातळी वाढली आहे. रविवारी ती ३६.९ टक्क्यांवर पोहोचली आहे.

उपयुक्त पाणीसाठा १९.३३ टीएमसी

उजनी धरणामध्ये रविवारी (ता.१) एकूण पाणीपातळी ४९३.२५० मीटर इतकी राहिली. तर एकूण पाणीसाठा ८२.९९ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा १९.३३ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ३६.०९ टक्के राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT