Rajiv Rajan singh  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

milk production: देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ होऊन २०२३-२४ या वर्षात दूध उत्पादन २३९.३० दशलक्ष टनावर पोहचल्याची माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजनसिंग यांनी दिली.

Dhananjay Sanap

Dairy News : महाराष्ट्रातील दूध दरावरून दूध उत्पादक नाराजी व्यक्त करत आहे. दूध संघांनी दूध खरेदी दर कमी केल्याचं दूध उत्पादक सांगतात. त्यावरून सध्या गोंधळ सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र देशातील दूध उत्पादनात वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ होऊन २०२३-२४ या वर्षात दूध उत्पादन २३९.३० दशलक्ष टनावर पोहचल्याची माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजनसिंग यांनी दिली. ते मंगळवारी (ता.२७) राष्ट्रीय दूध दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

देशात २०२२-२३ मध्ये दूध उत्पादन २३०.५८ दशलक्ष होते. परंतु दुधाची उत्पादकता वाढल्याने २०२३-२४ मध्ये दूध उत्पादन २३९.३० दशलक्ष टनांवर पोहचले. देशातील दूध उत्पादनातील सरासरी वाढ ६ टक्के आहे. तर जगाची दूध उत्पादनातील सरासरी वाढ २ टक्के आहे, असंही सिंह म्हणाले.

वर्गीस कुरियन यांच्या जयंतीदिनी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने देशातील दूध उत्पादनाची आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात येते. देशातील प्रति व्यक्ति प्रति दिवस दूध वापराचं परांह वाढल्याच सिंग यांनी सांगितलं. सिंग म्हणाले, "देशातील प्रति व्यक्ति प्रतिदिवस दूध वापर २०२२-२३ मध्ये ४५९ ग्रॅम होतं. परंतु त्यामध्ये वाढ होऊन २०२३-२४ मध्ये प्रति व्यक्ति प्रति दिवस दूध वापर ४७१ ग्रॅमवर पोहचल्याचा दावाही सिंह यांनी केला आहे.

सिंग यांनी दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरजही व्यक्त केली. २०३० पर्यंत देशातील पशुधन लाळ्या आणि खुरकुद रोग मुक्त होईल. त्यातून दूध निर्यातही वाढेल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. सिंग म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दूध उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून उत्पन्न वाढेल आणि मध्यस्थी दूर करता येतील, असंही सिंग म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील दूध उत्पादक दुधाला कमी दर मिळत असल्याने हैराण झाले आहेत. त्यात राज्यातील दूध उत्पादकताही उत्तर भारतातील राज्याच्या तुलनेत कमी असल्याचं शेतकरी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT