Sangli News : जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार २८३ खातेदारांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणीची नोंदणी केली आहे. अजूनही अंदाजे ३ लाख ४७ हजार २४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसह अन्य कृषी विभागाच्या योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असल्याने खातेदारांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात ७ लाख ५१हजार ५२३ खातेदारांची संख्या आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजना गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने ॲग्रीस्टॅक योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संचन, हंगामी पिकांची माहिती संच यासह विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिaळणार आहे.
यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) ३५३, ग्रामसेवक ४९४ आणि कृषी सहाय्यक ३१० असे ११७५ काम करत असून त्यांना १३७६ सहाय्यक करत आहेत. तसेच ६५० पथके आहेत. जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ॲग्रीस्टॅकची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास, तलाठी आणि कृषी विभाग एकत्र खातेदारांची नोंदणी करत आहेत. या तिन्हीविभागाकडून नोंदणीसाठी गावोगावी जनजागृती, प्रचार आणि प्रसिध्दी केली आहे.
परंतु शेतकऱ्यांकडून नोंदणीसाठी प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात ४ लाख ४ हजार २८३ खातेदारांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून ओळखपत्र क्रमांकही घेतला आहे. जत तालुक्यात सर्वाधिक खातेदारांनी नोंदणी केली आहे. तर पलूस तालुक्यात सर्वांत कमी नोंदणी झाली आहे.
सध्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा, पीक विमा योजना सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या खातेदारांनाच योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली नसल्यास विविध योजनेत सहभागी होता होणार नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तालुकानिहाय ॲग्रीस्टॅक नोंदणी दृष्टीक्षेप
तालुका नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
खानापूर २८९४२
कवठेमहांकाळ ३१६३३
तासगाव ४३४७७
मिरज ५२०८१
आटपाडी २७६०५
पलूस २४१९२
वाळवा ५५९९३
जत ७७०९२
कडेगाव ३१८६५
शिराळा ३१३९८
एकूण ४ लाख ४ हजार २८३
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसह अन्य कृषी विभागाच्या योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक लवकरात लवकर काढावा. नोंदणी नसेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही.- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.