PM Kisan Farmers agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार पीएम किसानचे होणार लाभार्थी

sandeep Shirguppe

PM Kisan Installment : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आज मौजे भारी (ता. यवतमाळ) येथे सायंकाळी विविध विकासकामांच्या उद्घाटनासोबत ते राज्यातील ८८ लाख लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे सोळाव्या हप्त्याचे १९६० कोटी वितरित करणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख ४८ हजार १७९ शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळणार आहे.

केंद्रातर्फे २८ फेब्रुवारी 'पीएम किसान उत्सव दिवस' म्हणून साजरा करण्याच्या सूचना कृषी खात्यांना दिल्या आहेत. या कार्यक्रमाला तालुका, जिल्हा पातळीवर आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार असून, पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या पीएम किसान निधी वितरणाच्या कार्यक्रमात या लिंक द्वारे (https://pmevents.ncog.gov.in/) शेतकरी सहभागी होऊ शकतात.

जिल्ह्यातल्या चार लाख ४८ हजार १७९ शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळेल. जिल्ह्यातील एकोणवीस हजार आठशे सत्तर खातेदारांचे बैंक खाते आधार अद्याप लिंक झालेले नाही. यामुळे या खातेदारांना हप्ता मिळणार नाही.

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास यांना बैंक खाते आधार लिंक ८८ नसलेल्या खातेदारांची यादी गावातील पोस्ट ऑफिसमध्ये देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन खाते उघडावे व आधार लिंक करावे. ४ हजार ७७४ खातेदारांची शेती फक्त गुंठ्यात आहे. अथवा शेतीच नाही आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाव नाही, अंगठ्याचा थम नाही, बाहेरील राज्यातून आले आहेत.

- अरुण भिंगारदेवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक

असे लाभार्थी ४ हजार ७७४ आहे. जिल्ह्यातील तालुकावार लाभार्थी

आजरा (२७१३२), भुदरगड (२९९७८),

चंदगड (३७०३५), गडहिंग्लज (४३९२८),

गगनबावडा (६६७५), हातकणंगले (४५५९०),

कागल (४६७५८), करवीर (५८६१०),

पन्हाळा (४२६७६), राधानगरी (३७९१२),

शाहूवाडी (२९३५५), शिरोळ (४२५३०).

शेतकरी महासन्मान निधीही जमा

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुमारे ८५ लाख व ८८ लाख लाभार्थ्यांना सुमारे ३८०० कोटी रुपयाचे देखील वितरण होणार. लाभार्थ्यांचे थेट आधार सलग्न बँक खात्यात एका क्लिकवर ही रक्कम जमा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT