Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत चार लाख ३५ हजार शेतकरी

Team Agrowon

Nagar News : ‘‘खरिपासाठीच्या पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख २५ हजार हेक्‍टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे.

एकूण ९ लाख २४ हजार अर्ज आले आहेत. आतापर्यंत दोन हजार ६७२ कोटी रक्कम विम्यापोटी संरक्षित झाली आहे. पंधरा दिवसांत अजून सहभाग वाढेल,’’ असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

खरिपातील दहा पिकांसाठी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भात, बाजरी, मका, तूर, मूग उडीद, सोयाबीन, कापूस, भुईमूग आदी पिके घेतली जात आहेत.

शासनाने यंदा भात पिकांसाठी ८, बाजरीसाठी १०१, भुईमुगासाठी ९०, सोयाबीनसाठी ७५, मुगासाठी ६३, उडदासाठी १५, तुरीसाठी ७९, कापसासाठी ६५ महसूल मंडले अधिसूचित केली आहेत. त्या मंडलांतील शेतकऱ्यांना त्या पिकांचा विमा भरता येत आहे.

तालुकानिहाय शेतकरी संख्या (कंसात संरक्षित क्षेत्र)

अकोले : ११,३५८ (१५,१६३), जामखेड : ३६,९६५ (५०,७१९), कर्जत : २५,१५१ (३३,८६८), कोपरगाव : ३१,३८४ (३७,२३८), नगर : १८,६-६ (२७,०५९), नेवासा : ५४,७२१ (५९,६१३), पारनेर : ४२,०७९ (५४,७३४), पाथर्डी : ३२,५४५ (३८,६६८), राहाता : २९,१६७ (३४,१०३), राहुरी : ३०,२७० (३१,५१२), संगमनेर : ४१,०२३ (४८,०२६), शेवगाव : ३३,४१० (३९,०६१), श्रीगोंदा : २७,९५८ (३०,२०९), श्रीरामपूर : २०,९२९ (२५,८८०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : शेतकरी म्हणून निवडून आलेले सभापती हुडेंसह पाच जण अपात्र

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Crop Damage Survey : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट; ई-पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT