Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Compensation : रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना विमा परताव्याची प्रतीक्षा

Waiting for Insurance Refund : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून दोन महिने लोटले तरीही विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून दोन महिने लोटले तरीही विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे.

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप विमा कंपन्यांकडून परतावाच जाहीर केलेला नसल्याची बाब पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील आंबा, काजू पिकाचा समावेश फळपीक विमा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील ३०,०६८ आंबा बागायतदार तर ६,८४१ काजू बागायतदार विमा योजनेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी एकूण २० हजार ७८६.१६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे.

२७ कोटी ३९ लाख ९ हजार १५ एकूण प्रस्तावित विमा रक्कम आहे. राज्य शासन हप्त्याची रक्कम ५३ लाख ३४ हजार ४६ तर केंद्र शासन हप्त्याची रक्कम ३१ लाख ३५ हजार ६४, शेतकरी हप्त्याची रक्कम २४ लाख ११ हजार ५० मिळून एकूण १० कोटी ८८ लाख १ हजार ६१ रुपये विमा हप्ता आहे.

जिल्ह्यात एकूण १ हजार ५५१ गावे व ८४५ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात ८२ महसूल मंडले असून, महसूल मंडलांअंतर्गत पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. ही यंत्रे डोंगरखोऱ्यातील, वाडीवस्तीलगतचे तापमान नोंदविण्यात दुर्बल ठरत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शासनाचे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित तापमानमापक यंत्र बसविण्याचे घोंगडे अद्याप भिजत आहे.

दरम्यान, विमा हप्त्यापोटी राज्य शासन ५३ लाख ३४ हजार ४६ रुपये भरते, तर केंद्र शासन ३१ लाख ३५ हजार ६४ रुपये, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हप्त्यापोटी २४ लाख ११ हजार ५० रुपये भरले आहेत. एकूण विमा हप्ता १० कोटी ८८ लाख १ हजार ६१ रुपये आहे.

दरवर्षी हवामानातील बदलाचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होतो. बागायतदार मोठ्या संख्येने विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, महसूल मंडलांतील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्याने प्रत्यक्ष नुकसान ग्राह्य धरले जात नाही, त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही.
राजन कदम, बागायतदार

वर्ष आंबा बागायतदार काजू बागायतदार एकूण शेतकरी

२०२१-२२ २२,३५७ ४,२२३ २६,५८०

२०२२-२३ २६,४१९ ५,८७१ ३२,२९०

२०२३-२४ ३०,०६८ ६,८४१ ३६,९०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT