Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Loan Disbursement: खरिपासाठी ३५ टक्के कर्जवाटप

Crop Loan 2025: खरीप हंगाम सुरू असतानाही केवळ ३५% पीक कर्जवाटप झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाचा खोळंबा आणि बँकांच्या संथगतीने वाटपामुळे पेरण्या तसेच शेती कामांवर मोठा परिणाम झाला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: यंदाच्या खरीप हंगामासाठी ३५ टक्के कर्जवाटप करण्यात आले असून, ४७ लाख ३५ हजारांपैकी १८ लाख ६ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. सार्वजनिक, ग्रामीण, लघुवित्त बँकांनी नेहमीप्रमाणे संथगतीने कर्जवाटप सुरू केले असून, जिल्हा बँकांचे कर्जवाटप वेगाने सुरू आहे.

मागील १५ दिवसांत कर्जवाटपात फारशी प्रगती झालेली नाही. अवेळी आलेल्या पावसामुळे राज्यातील पेरण्या लांबल्या आहेत, परिणामी कर्जवाटपही संथगतीने सुरू आहे.राज्यात २० जूनपर्यंत २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. कृषी विभागाच्या कोकण विभागात ४ टक्के, नाशिक विभागात २५, कोल्हापूर विभागात १८, छत्रपती संभाजीनगर विभागात २९ टक्के,

लातूर विभागात २५ टक्के, अमरावती विभागात १३, तर सर्वांत कमी नागपूर विभागात तीन टक्के पेरण्या झाल्या आहेत. कपाशीची केवळ २३ टक्के पेरणी झाली असून सोयाबीन २० टक्के पेरणी झाली आहे. भाताची केवळ ३ टक्के पेरणी झाली आहे. खरिपाच्या ज्वारीची तीन टक्के पेरणी झाली आहे.

२०२५-२६ साठी ४४ हजार, ७६ लाख कोटींचा पतआराखडा सादर करण्यात आला. यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी ८० हजार ४०० कोटींचा पीक कर्जवाटपाचा लक्षांक निश्चित केला आहे. मागील वर्षी हाच लक्षांक ७४ हजार ७८१ कोटी होता. त्यापैकी ६५ हजार ८९९ कोटी म्हणजेच ८८ टक्के कर्जवाटप केले होते. कृषी क्षेत्रासाठीच्या मुदत कर्जाचा लक्षांक एक लाख २० हजार कोटी निश्चित केला आहे.

खरीप हंगामासाठी कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांना २५ हजार ८०३ कोटी तर सार्वजनिक आणि ग्रामीण बँकांसाठी ३९ हजार ८६५ तर खासगी, लघुवित्त बँकांसाठी १० हजार ४५२ कोटींचा लक्षांक आहे. यापैकी जिल्हा बँकांनी ६१ टक्के म्हणजे १८ हजार ९६७ कोटी रुपयांचे १३ लाख ६० हजार शेतकऱ्यांना वाटप केले आहे. सार्वजनिक बँकांनी केवळ २३ टक्के म्हणजे २८ हजार १७१ कोटींपैकी केवळ ६ हजार ५०५ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. खासगी, लघुवित्त बँकांनी १३ टक्के म्हणजे ६ हजार ९५६ कोटींपैकी ८७४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

सार्वजनिक, ग्रामीण बँकांचे इशाऱ्याकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी सीबिल सक्ती करू नका. तसेच पीक कर्जवाटप वेळेत करा अन्यथा कारवाई करू, असा इशारा राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिला होता. मात्र, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. यंदा सार्वजनिक क्षेत्र आणि ग्रामीण बँकांच्या कर्जवाटप संथगतीने सुरू आहे.

यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात ३३ हजार ६५१ कोटी रुपये कर्जवाटपाचा लक्षांक आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी २८ हजार १७१ कोटीपैकी केवळ ६ हजार ५०५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तर खासगी, लघुवित्त बँकांनी ६९५६ कोटींपैकी ८७४ कोटींचे वाटप केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Foodgrain Production: अधिक उत्पादनापासून अधिक उत्पन्नाकडे

Rain Deficit: पुढ्यातील तिढा

Suspended Employees Protest: निलंबितांसाठी आंदोलन करणाऱ्यांचे टोचले कान; शेतकऱ्यांना वेठीस धरणारी कृती टाळण्याचा आयुक्तांचा सल्ला

Khadi Board Employee Shortage : आकृतिबंधातून आवश्यक मनुष्यबळ मिळण्याची आशा; खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती साठे यांची माहिती

Shiv Sena Symbol Case: पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा: ॲड. कपिल सिब्बल

SCROLL FOR NEXT