Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ३३७ उमेदवारी अर्ज वैध

Vidhansabha Election 2024 : परभणी जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे. बुधवारी (ता. ३०) झालेल्या अर्जाच्या छाननीत परभणी जिल्ह्यात १५० उमेदवारी अर्ज आणि हिंगोली जिल्ह्यात १८७ उमेदवारी अर्ज वैध ठरले. सोमवारी (ता. ४) उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

जिंतूर विधानसभा मतदारसंघात ५० पैकी ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यात भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोर्डीकर साकोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. प्रभाकर बुधवंत, एमएआयएमचे शेख सलीम, अपक्ष गणेश काजळे, खंडेराव आघाव, समीर दुधगावकर आदींचे अर्ज आहेत.

परभणी विधानसभा मतदारसंघात ४६ पैकी ३७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. शिवसेनाचे आनंद भरोसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. राहुल पाटील, मनसेचे श्रीनिवास लाहोटी, बहुजन समाज पार्टीचे अशोक खरात, एमआयएमचे इम्तियाज खान, अपक्ष विजय वरपुडकर आदीचे अर्ज आहेत.

गंगाखेड विधानसभा मतदार संघात २९ पैकी २५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीचे सीताराम घनदाट, मनसेचे रूपेश देशमुख, राष्ट्रीय मराठा पार्टीचे माधव शिंदे, अपक्ष श्रीकांत भोसले, विठ्ठल निरस, भगवान सानप आदीचे अर्ज आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघात ५३ पैकी ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेश विटेकर, कॉँग्रेसचे सुरेश वरपुडकर, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश फड, राष्ट्रीय समाज पक्षाचे सईदखान, अपक्ष अब्दुल्लाखान दुर्राणी, माधवराव फड, दादासाहेब टेंगसे, जगदीश शिंदे, नितीन लोहट, संजय कच्छवे, समीर दुधगावकर आदीचा समावेश आहे.

वसमत विधानसभा मतदार संघात ६३ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे चंद्रकांत नवघरे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रीती जयस्वाल, बहुजन समाज पक्षाचे नागिंदर लांडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मुंजाजी बंडे आदीचे अर्ज आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघात ५२ नामनिर्देशनपत्र वैध ठरली त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष टारफे, शिवसेनाचे संतोष बांगर.

हिंगोली विधानसभा मतदार संघात ७२ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. त्यात भारतीय जनता पक्षाचे तान्हाजी मुटकुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपाली पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे पंजाब हराळ आदीचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT