Satara News : उत्तर माणच्या ३२ गावांना पाणी देण्याच्या जिहे-कठापूरच्या बंदिस्त पाइपलाइन योजनेचे भूमिपूजन केले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होऊन १५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दहिवडी येथे ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (ता. २२) आयोजित भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अमरसिंह साबळे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार राम सातपुते, अतुल भोसले, विक्रम पावसकर, भरत पाटील, प्रशांत परिचारक, मकरंद देशपांडे, नरेंद्र पाटील, मदन भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भगवानराव गोरे, अंकुश गोरे, शिवाजी शिंदे, धनंजय चव्हाण, मनोज पोळ, माण, खटावसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘जिहे-कठापूरचे हे पाणी आतापर्यंत आले असते; पण आपले सरकार गेले अन् अडीच वर्षे नाकर्त्या लोकांचे सरकार आले. आपण जी योजना मंजूर केली होती, ती थांबवण्याचे काम त्यांनी केले. जिहे-कठापूरचे पाणी येत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, असा शब्द जयकुमार यांनी दिलाय;
पण आपले हे पाणी डिसेंबर २४ रोजी येणार आहे अन् विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होतेय. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय. तुम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार राहा.’’
या योजनेला निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. कारण तिजोरीची चावी माझ्याकडे आहे अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलेय, की दुष्काळी भागासाठी तिजोरी रिकामी केली तरी चालेल, असेही ते म्हणाले. तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अरुण गोरे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.