Wheat  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : पाणीटंचाईमुळे गहू पेरणीत ३१ टक्क्यांनी घट

Agriculture Department : कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१ हजार ७९७ हेक्टरने गव्हाचा पेरा कमी झाला आहे. तुलनेत गहू पेरणी क्षेत्र ३१ टक्क्यांनी कमी झाल्याची स्थिती आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News : यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान २५ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी भूजल पातळी घटल्याने विहिरींनी तळ गाठला असून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अन्नधान्य पिकात सर्वाधिक पेरा असलेल्या गहू पिकाच्या पेरणीवर परिणाम दिसून आला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१ हजार ७९७ हेक्टरने गव्हाचा पेरा कमी झाला आहे. तुलनेत गहू पेरणी क्षेत्र ३१ टक्क्यांनी कमी झाल्याची स्थिती आहे.

मालेगाव, सिन्नर व येवला या तालुक्यांत शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत. तर चांदवड, देवळा व नांदगाव या तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात सावध भूमिका घेतली आहे.

धान्य व जनावरांसाठी भुस्सा यासाठी गहू पेरणी करत असतात. मात्र पाण्याचा प्रश्न गंभीर वळणावर असल्याने शेतकऱ्यांनी गहू पेरणी कमी आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक गहू पेरणी निफाड तालुक्यात असते. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरा कमी आहे. सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने येथेही पेरणी निम्म्यावर आल्याची स्थिती आहे.

येवला तालुक्यातही पेरा निम्म्यावर आहे. मात्र दिंडोरी तालुक्यात सरासरीहून अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत ७०० हेक्टर क्षेत्र वाढले आहे. तुलनेत नाशिक तालुक्यात पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे.

कसमादे भागात यंदा पावसामुळे परिणाम दिसून आला आहे. मालेगाव तालुक्यात मागील वर्षी ७,२०० हेक्टरवर पेरा होता. मात्र यंदा ४६३१ हेक्टर घट दिसून आली. सटाणा तालुक्यात सरासरी ५३४५ हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा मात्र तो २७८८ हेक्टर आहे. कळवण तालुक्यात मागील वर्षी ३५१५ हेक्टरवर पेरा होता.

यंदा १० टक्के पेरणी कमी आहे. देवळा तालुक्यात पेरणी कमीच असते, मात्र मागील वर्षी सरासरी ११६५ हेक्टर पेरा पूर्ण झाला होता. यंदा अवघ्या ३११ हेक्टरवर पेरा पूर्ण आहे. तर पेठ, त्रंबकेश्वर, इगतपुरी व सुरगाणा तालुक्यांत थोड्याफार प्रमाणात गहू पेरण्या उपलब्ध पाण्यानुसार करण्यात आल्या आहेत.

एक पाण्यापासून ते ६ पाण्यापर्यंत येणाऱ्या गव्हाच्या जाती उपलब्ध आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोरडवाहू वेळेवर पेरणी, नियंत्रित पाण्याखालील पेरणी, वेळेवर ओलिताखाली पेरणी आणि उशिरा व अतिउशिरा म्हणजेच १५ डिसेंबरनंतर ते १५ जानेवारीपर्यंत पेरणी करणे महत्त्वाचे असते. पाऊसमान कमी झाल्यास पेरणी कमी होते तर पाऊस झाल्यास क्षेत्र वाढते. शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता ओळखूनच वाणांची पेरणीसाठी लागवड करायला हवी. मात्र शिफारशीनुसार कामकाज होताना दिसत नाही.
डॉ. सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ, गहू संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता. निफाड
यंदा पाऊस कमी असल्याने गहू पेरणी कमी झाली आहे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर पेरणी केली आहे. यंदा विहिरीत पालखेड कालव्याचे उशिराने आवर्तन आले. त्या भरवशावर गहू आहेत. मात्र पुरेसे पाणी नसल्याने उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
मल्हारी जाधव, शेतकरी, जऊळके, ता. येवला.

२०२३-२४ मधील तालुकानिहाय पेरणी स्थिती

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

मालेगाव ५५३० २६१२ ४७.२३

बागलाण ५३४२ २७८८ ५२.१९

कळवण ३३३७ ३००६ ९०.८

देवळा ११६५ ३११.३ २६.७२

नांदगाव ३३१७ ४३७.२ १३.८

सुरगाणा १२०९.५४ ७३८.६ ६१.६

नाशिक २६३८.३९ ३५१५.८६ १३३.२६

त्र्यंबकेश्वर ६७९.७५ ३५५ ५२.२२

दिंडोरी ७०८०.०८ ७७८७ १०९.९८

ईगतपुरी १३२३.७२ ९३०.२ ७०.२७

पेठ ६६८.४४ ५६९.२ ८५.१५

निफाड १२७७०.०५ ८३७१.४५ ६५.५६

सिन्नर ९२७६.५२ ६४८२ ६९.८८

येवला ६३५१ ३१४९ ४९.५८

चांदवड ३४६२.३५ ११२६.८ ३२.५४

पेरणीची तुलनात्मक स्थिती

वर्ष सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी

२०२२-२३ ६७१९८ ६३९७६.७५ ९६.६९

२०२३-२४ ६४१५०.८५ ४२१७९.६१ ६५.७५

कमी झालेले क्षेत्र ३०४७ २१७९७.१४ ३०.९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT