Election
Election Agrowon
ॲग्रो विशेष

Beed Election Update : माजलगाव खरेदी विक्री संघ निवडणुकीत ३१ उमेदवार रिंगणात

Team Agrowon

Beed Election News : माजलगाव येथील खरेदी- विक्री संघ निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. अर्ज माघार घेण्याचा मंगळवार (ता. ११) शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेतल्यानंतर आता १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात असून २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

खरेदी - विक्री संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन जोरदार तयारी झाली आहे. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. २७ मार्चला नामनिर्देशन पत्र छाननी झाली.

यामध्ये आक्षेप न आल्याने ५९ अर्ज मंजूर झाले. निवडणुकीमध्ये एकही अर्ज बाद झाला नसल्याने १५ जागेसाठी ५९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. मंगळवारी (ता. ११) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळे १५ जागेसाठी ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बुधवारी (ता. १२) उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. २३ एप्रिलला मतदान व मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपमध्ये दुरंगी लढत होत आहे.

भाजप उमेदवार व मतदार संघ

संस्था मतदार संघ : कदम अशोक नरहरी, चव्हाण धोंडिराम गणेश, जगताप गणपत बाबासाहेब, पवार शंकर गोपीनाथ, बोचरे विश्वंभर मोकींद, वाघमारे दिलीप हरिभाऊ.

वैयक्तीक सभासद मतदारसंघ : गायकवाड मंचक संदीपान,जाधव दीपक राजेसाहेब,जाधव बालाजी आश्रुबा.

महिला प्रतिनिधी मतदारसंघ : कोल्हे बाबई विश्वंभर,ताकट सविता उद्धव.

विजा,भज किंवा विमाप्र मतदारसंघ : चोरमले मोहन नारायण.

इतर मागासवर्गीय : रासवे गणेश निवृती.

अनुसूचित जाती जमाती सदस्य : जाधव विश्वनाथ मुक्ताजी.

राष्ट्रवादी उमेदवार व मतदार संघ

संस्था मतदारासंघ : अत्तार जमिर अमिर, चाळक तुकाराम सदाशिव, जाधव विठ्ठल दादाराव, पाठक भालचंद्र मधुकर, बादाडे संगीता बळिराम, शिंदे सत्यनारायण वसंत, सोळंके बंडू सोपान.

वैयक्तीक सभासद : गरड हरिभाऊ मुंजाजी, रांजवन लालासाहेब हरिभाऊ, शेजूळ श्रीकृष्ण सुधाकर.

महिला प्रतिनिधी : जाधव नीता ज्ञानेश्वर, तांगडे सुभद्रा दताञय.

विज,भज किंवा विमप्र : हुबाले आसाराम गंगाधर.

इतर मागासवर्गीय : गोबरे वैजनाथ सुभाष.

अनुसूचित जाती जमाती : खंडागळे बबन जिजा यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT