Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : सांगलीतील ३० हजार शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Crop Damage : सांगली जिल्ह्यातील ३० हजार ८१९ शेतकऱ्यांचे १५ हजार ९७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या पाच दिवसांत मॉन्सूनत्तोर पाऊस, वादळी वारे यामुळे जिल्ह्यातील ३० हजार ८१९ शेतकऱ्यांचे १५ हजार ९७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर झालेल्या मॉन्सूनत्तोर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिरायत, बागयाती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. वादळी वारे, पाऊस याचा सर्वांत फटका फळपिकाला बसला आहे.

जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता नऊ तालुक्यांतील पिके बाधित झाली आहेत. अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक द्राक्ष पिकाला बसला असून ज्वारी, शेवगा, तूर, आदी पिकांचेही नुकसान झाले आहे. आठ तालुक्यातील ३११ गावांतील १५ हजार ९७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कृषी विभागासह संबंधित विभागाने डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. एका आठवड्यात तातडीने पंचमाने पूर्ण केले आहेत. नुकसान झालेल्या पिकांसाठी ३५ कोटी ६५ लाख १५ हजार रुपये अपेक्षित भरपाईचा निधीची मागणी केली असल्याचे माहिती कृषी विभागाने दिली आहे.

त्याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे सादर केला आहे. पंचमान केलेला अहवाल वरिष्ठ विभागाकडे देऊन जवळपास एक महिन्याच्या कालावधी होत आला आहे. सध्या दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पैशांची आवश्यकता असून पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT