Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : भामा आसखेड धरणात ३० टक्के पाणीसाठा जमा

Water Storage : खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता. खेड) धरणात सोमवारपर्यंत (ता. २२) ३०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Team Agrowon

Pune News : खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता. खेड) धरणात सोमवारपर्यंत (ता. २२) ३०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास १७ टक्क्यांनी कमी असून, मागील वर्षी आजपर्यंत धरणात ४७.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून ३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा २.८४ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा २.३६ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ४७.८४ टक्के पाणीसाठा होता. धरणातून पुणे शहराच्या पूर्व भागासह तीर्थक्षेत्र आळंदीला पाणीपुरवठा केला जात आहे.

या धरणातून पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवडसाठी भामा आसखेड धरणातून २.१४ टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे.

धरणाच्या बुडीत क्षेत्रात आणि पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. पर्यटक किंवा नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT