Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Help : नुकसानग्रस्तांसाठी ३० कोटींची मागणी

Crop Damage Compensation : नांदेड जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह गारपीट (Stormy wind hail) होऊन जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले होते. या बाबत शासनाने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण केले आहेत.

यात ११ तालुक्यातील ३५ हजार ५४३ शेतकऱ्यांच्या २१ हजार ५६९ हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० कोटी ५२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात मार्च महिन्यात सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. यात नांदेड, मुदखेड, अर्धापूर यासह अकरा तालुक्यांत बागायती क्षेत्रासह फळबाग, भाजीपाला, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

याचा सर्वाधीक फटका अर्धापूर तसेच मुदखेड तालुक्याला बसून केळींच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यानंतर नुकसानग्रस्त भागाचा पालकमंत्री शिरीष महाजन, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राऊत यांनी आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली होती. या बाबत शासनाने कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार शासकीय यंत्रणेने पंचनामे पूर्ण केले आहेत.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र, लागणारा निधी

तालुका - बाधित शेतकरी- बाधित क्षेत्र - मिळणारा निधी

नांदेड - ३२६४ - ११९६.२२ - ०१,१४,३४,६७०

अर्धापूर- ४७७ - ३३४.८०- ५०,७०,४००

कंधार- ६३२ - १३५.५५- १४,११,०२५

लोहा - २७७४ - ४५३.५८ - ५५,०२,९८०

भोकर- ६०६ - २४२.०० - ४८,६७,५००

मुदखेड- १४,६६३ - ८,७२४.२९ - १४,५१,५६,६०५

देगलूर- १९३ - १०८.७१ - ०९,४९,३५५

मुखेड- ७११७- ४५७५.००- ०४,०४,२६,९००

हदगाव- ३५५- २७०.००- २२,९५,०००

हि.नगर - १३८७- १०८९.८०- ०७,५१,७२,७५०

किनवट- ५०७५- ४४४९.५५ - ०७,५१,७२,७५०

एकूण- ३६,५४३ - २१,५७९.५०- ३०,५२,१२,६८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT