Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : मोडनिंबकरांचा उडाला प्राधिकरणावरील विश्‍वास

Water Supply Scheme : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुमारे १६ कोटी रुपये खर्च करून मोडनिंब येथे जलजीवन मिशनचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुमारे १६ कोटी रुपये खर्च करून मोडनिंब येथे जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. हे काम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चपर्यंत मोडनिंबकर जनतेस पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. या योजनेच्या कार्यपूर्तीची मुदत जानेवारी २०२५ मध्येच संपली असून, तीन वर्षात केवळ ४० टक्केच काम पूर्णत्वास गेले आहे.

या कुर्मगतीचा विचार केल्यास ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. सद्य:स्थितीत सहा दिवसांआड पाणीपुरवठा सोसणाऱ्या जनतेचा जलजीवन मिशनवरील विश्वास उडत चालला आहे.

अस्तित्वात असलेल्या जुन्या योजनेतून अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. येवती येथील विहिरीतून जलवाहिनीद्वारे उचलले जाणारे पाणी सुर्वे प्रांत येथील फिल्टर हाऊसमध्ये साठविले जाते.

या जुन्या जलवाहिनीस मोठ्या प्रमाणावर गळती आहे. शिवाय शहरातील वितरण व्यवस्था पूर्णतः कोलमडली गेली आहे. शहरातील सर्वात मोठा जलकुंभ मागील दहा वर्षांपासून गळतीमुळे बंद आहे. गोरेनगर, रेल्वे स्टेशन परिसरात जलकुंभ अस्तित्वात नसल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

या सर्वांचा एकत्रित ताण मोडनिंबकरांना सहन करावा लागत आहे. याहीपेक्षा एप्रिल ते जून या कालावधीत कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे कठीण परिस्थिती असणार आहे. प्राप्त परिस्थितीत जीवन प्राधिकरणावर जनतेचा रोष असला तरी, नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत याचे परिणाम दिसून येणार आहेत. ‘काम दमदार’ करणाऱ्या ‘विकासरत्नां’नी समाज माध्यमांच्या भिंतीतून बाहेर येऊन मोडनिंबकरांची तहान भागविणे गरजेचे आहे.

जलजीवन मिशनची सद्य:स्थिती

नवीन जलवाहिनीचे बरेचसे काम पूर्णत्वाकडे; परंतु एअर वॉल्व्ह बसविणे बाकी

येवती तलावातील जॅकवेलचे काम पूर्ण

विहिरीचे काम पूर्ण परंतु पंपहाऊसचे बांधकाम अपूर्ण

फिल्टर हाऊस येथील काम अपूर्ण

सौरऊर्जा निर्मिती अपूर्ण

एकाही जलकुंभाचे काम पूर्णत्वाकडे नाही

वितरण व्यवस्थेच्या कामास अजूनही सुरवात नाही

ठेकेदारास कामगारांच्या अडचणीमुळे विलंब होत आहे. येत्या दोन महिन्यांत तलावातील पाणी फिल्टर हाऊसपर्यंत येण्यासाठी नियोजन करीत आहोत.
- गुणवंत करळे, उपअभियंता, म. जी. प्रा., बार्शी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू

Sugarcane Price Cut: प्रतिटनामागे १५ रुपयांची कपात...! 'हा तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा', राजू शेट्टींचा आरोप, रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल

Agriculture Research: सहजीवी जिवाणूंमध्ये प्रथमच आढळली वैशिष्ट्यपूर्ण संरचना

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT