Takari Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’साठी ७३ पाणी वापर संस्था स्थापन

Irrigation Project : ताकारी सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन केली जात आहे.

Team Agrowon

Sangli News : ताकारी सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन केली जात आहे. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात ७३ पाणी वापर संस्थांची स्थापना केली आहे.

यामधील ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे. यापैकी आठ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतर प्रक्रिया झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया झाली आहे. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतीचे भविष्य आता पाणी वापर संस्थांच्या हाती जाणार आहे.

ताकारी योजनेत कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव, मिरज आणि वाळवा तालुक्यातील ७१ गावे समाविष्ट आहेत. या योजनेचे लाभ क्षेत्र सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र आहे. या लाभ क्षेत्राला वेळेत पाणी मिळावे, पाणीपट्टी वसुलीसह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पाटबंधारे विभागान पुढाकार घेतला आहे.

त्यानुसार या सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात ७३ पाणी वापर संस्थांची स्थापनाही झाली आहे. यामधील ५३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली आहे. यापैकी आठ संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे. याशिवाय ३१ संस्थांची करारनामे प्रक्रिया झाली आहे.

सिंचन योजनेचे पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणे हा पाणी वापर संस्थांचा उद्देश आहे. संस्थांना योजनेकडून धनमापन पद्धतीने मोजून दिले जाणार आहे. यामुळे समन्यायी पाणी वितरण होणार आहे. या पाणी वापर संस्थांमध्ये राजकारणाचा शिरकाव होण्याची भीती आहे.

मात्र, तरीही पाणी वापर संस्थांच्या संचालक मंडळ निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जात असल्याने येथे बळीराजाला मतदार राजाप्रमाणे महत्त्व राहणार आहे. आठ पाणी वापर संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काळात उर्वरित पाणी वापर संस्थांकडे लाभक्षेत्र हस्तांतराचे नियोजन ताकारी उपसा सिंचन योजनेचे केले आहे.

योजना प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतरची दिशा

ताकारी योजनेच्या प्रकल्पाची कामे अंतिम टप्यात आहेत. याशिवाय बंदिस्त नलिकांची व लाभक्षेत्र विकासाची कामे वर्षभरात पूर्ण होतील. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

पाणी वापर संस्थांना सिंचन व्यवस्थापन, पाणी आवर्तन नियोजन, पाणी वितरण, पाणीपट्टी आकारणी व वसुली आदींबाबत सर्वाधिकार असणार आहेत. तात्पर्य, ताकारी योजना शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यासाठी राबवलेली यशस्वी योजना ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables: रानभाज्यांतील जैवसक्रिय घटकांचे महत्त्व

Fish Feed: मत्स्य खाद्याचे प्रकार अन्‌ पोषणमूल्ये

Maharashtra Loan Waiver 2026 : शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीच्या यादीत नसेल तर घाबरू नका; कृषिमंत्र्यांनी दिली ग्वाही

Parliament Monsoon Season 2026: संसदेत विरोधकांची आक्रमक भूमिका कायम, 'एमपीएससी' पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांचीही निदर्शने

Turmeric Variety: देशभरात प्रसिद्ध हळदीचे विविध वाण

SCROLL FOR NEXT