Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Season : सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला वेग आला असून, यंदा जिल्ह्यातील ३४ कारखान्यांपैकी ९ साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष गाळपाला सुरवात झाली आहे

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला वेग आला असून, यंदा जिल्ह्यातील ३४ कारखान्यांपैकी ९ साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष गाळपाला सुरवात झाली आहे. या कारखान्यात आतापर्यंत जवळपास ३ लाख ४४ हजार ४८६ टन उसाचे गाळप झाले आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमुळे गाळपावर काहीसा परिणाम झाला होता. जिल्ह्यातील सहा साखर कारखानदार आणि कारखान्यांच्या यंत्रणा निवडणुकीत गुंतल्याने गाळपाला काहीशी संथगती आली होती.

पण आता गेल्या दोन दिवसांपासून गाळपाने वेग घेतला आहे. जिल्ह्यात सध्या आष्टी (ता.मोहोळ) येथील आष्टी शुगर, आलेगाव (ता.माढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स, खामगाव (ता.बार्शी) येथील येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट, तिऱ्हे (ता.उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ शुगर, माळीनगर (ता.माळशिरस) येथील सासवड माळी शुगर,

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखाना, सदाशिवनगर (ता.माळशिरस) येथील शंकर सहकारी साखर कारखाना आणि अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहित पाटील साखर कारखाना अशा ९ कारखान्यांत गाळप सुरू आहे.

जिल्ह्याचा साखरेचा सरासरी उतारा ७.३ टक्के आला आहे. जिल्ह्यात या कारखान्यात आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ४८६ टन उसाचे गाळप झाले असून, २ लाख ४९ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा साधारण १०० ते १२० दिवस हंगाम चालेल, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT