Ujani Pipeline Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Pipeline : उजनी पाइपलाइनसाठी २६७ कोटींचा निधी देणार

SuvarnJaynti Nagrotthan Mahaabhiyan Yojana : उजनी येथून पाइपलाइन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा ९० कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाइपलाइन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा २६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे ९० कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.३) येथे दिली.

जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, शहर पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने शहरातील लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दुबार व तिबार पंपिंग महापालिकेला करावे लागते, त्यासाठी आवश्यक असलेला साडेतीन कोटीचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी साडेतीन कोटीचा निधी लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती आहे, त्या अनुषंगाने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत, त्यातून प्रत्येक गावात पाणीपुरवठा झाला पाहिजे. यासाठी सांगोला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगल्या प्रकारे चालवली जात आहे.’’

पंढरपूरसाठी अयोध्या, वाराणसीतील कामे पहा

पंढरपूर देवस्थान आराखड्यातर्गंत ७३ कोटींचा निधी मंजूर असून, या अंतर्गत पुरात्व विभाग काम करत असून माहे मार्च २०२४ पर्यंत त्यांना आवश्यक असलेला पाच कोटीचा निधी त्वरित देण्यात येत आहे. या अंतर्गत कामे करत असताना पुरात्व विभागाने लोक भावना लक्षात घेऊन कामामध्ये वेगळेपणा व नावीन्यात आणावी.

यासाठी उज्जैन, अयोध्या व वाराणसी येथे जाऊन तेथील मंदिराचे केलेल्या कामाची पाहणी करावी, चांगल्या व दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT