Kharif Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2024 : खरिपात २५ लाख क्विंटल बियाणे मिळणार

Seed For Kharif : यंदाच्या खरिपात चांगला मॉन्सून बरसण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बियाणे उद्योगात समाधानकारक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

मनोज कापडे

Pune News : यंदाच्या खरिपात चांगला मॉन्सून बरसण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बियाणे उद्योगात समाधानकारक उलाढाल होण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कापूस, सोयाबीन, भात, मका, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकाची लागवड खरिपात होते. यंदा खरिपाचे क्षेत्र दीडशे लाख हेक्टरच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील खरिपाचे क्षेत्र लक्षात घेता पेरणी करता बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार अन्नधान्य पिकासाठी किमान १९ लाख २० हजार क्विंटल बियाणे आवश्यक आहे.

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, यंदा राज्यात बियाण्यांची टंचाई राहणार नाही. बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार मागणीचा अभ्यास केल्यास महाबीजकडून पावणेचार लाख क्विंटल तर राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ५९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होईल.

याशिवाय राज्यातील खासगी बियाणे कंपन्यांमार्फत २० लाख ७९ हजार क्विंटल बियाणे विक्रीसाठी आणले जाईल. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांसाठी एकूण २५ लाख १३ हजार बियाणे उपलब्ध असेल.

केंद्र शासनाने भात, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या स्वपरागित पिकांकरिता ३३ बियाणे बदल दराचे लक्षांक ठेवले आहेत. तसेच, सुधारित बाजरी, मका, सूर्यफूल, करडई या परंपरागत बियाणे बदल दराचे लक्षांक ५० टक्के दिलेले आहेत. मात्र, केंद्राने संकरित ज्वारी, संकरित बाजरी आणि इतर संकरित पिकांकरिता बियाणे बदल दराचे लक्षांक १०० टक्के ठेवलेले आहेत.

...अशी असेल बियाण्यांची उपलब्धता

पीक-गरज-उपलब्धता (आकडे क्विंटलमध्ये)

भात-२३०४००-२५५०१३

ज्वारी-१६१२५-१६४८५

बाजरी-१२५००-१६१९९

मका-१४२५००-१६१९९

तूर-५६८७५-५७१८५

मूग-११५५०-११६७०

उडीद-२१०००-२४५४५

भुईमूग-१२०००-१२२८२

तीळ-१३७.५-८७०

सोयाबीन-१३१२५००-१८४४९१४

कापूस-९९७५०-१०८८४१

इतर पिके-५२००-५६५५

एकूण गरज-१९२०५३८-एकूण उपलब्धता २५१३४४९

घरचे सोयाबीन बियाणे ही संकल्पना कृषी विभागाने राज्यभर प्रभावीपणे राबविली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी ७५० कोटींचे बियाणे स्वतः तयार केले होते. येत्या खरिपातदेखील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्यावर भर द्यावा.
- दिलीप झेंडे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

SCROLL FOR NEXT