Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming: शिराढोण येथील शेतकरी गटाला सोयाबीन बियाणेवाटप

Farmer Support: कळंब तालुक्यातील शिराढोण येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शेतकरी गटातील २५ शेतकऱ्यांना शुक्रवारी (ता. २०) सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Dharashiv News: कळंब तालुक्यातील शिराढोण येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शेतकरी गटातील २५ शेतकऱ्यांना शुक्रवारी (ता. २०) सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी भागवतराव सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शिराढोण येथील एका शेतकरी गटास अनुदानावरील बियाणे देण्यासाठी सहायक कृषी अधिकारी पद्मसिंह गायकवाड यांनी सुरुवातीला योजनेची माहिती असलेली नोटीस ग्रामपंचायत कार्यालयात चिकटवली.

त्या माध्यमातून गावातील नोंदणीकृत शेतकरी गटाचे अध्यक्षांना ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज देण्याचे आवाहन केले. त्यानंतर दिलेल्या मुदतीत प्राप्त अर्जांची छाननी करून त्यापैकी पात्र अर्जांची सरपंच लक्ष्मी म्हेत्रे व अर्ज केलेल्या गटाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथे ऑफलाइन लॉटरी काढून कृषी समृद्धी शेतकरी गटाची निवड केली.

निवड केलेल्या गटाचे अध्यक्ष यांनी आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर गटातील पंचवीस सभासदांना प्रत्येकी एक बॅग सोयाबीन बियाणेवाटप करण्यात आले.या वेळी सहायक कृषी अधिकारी पद्मसिंह गायकवाड, गटाचे अध्यक्ष जगदीशचंद्र जोशी, सचिव राजेंद्र कापसे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेश्वर पाटील, अजय पाटील, नाशेर पठाण, सुरेश महाजन व इतर सभासद शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Washim Rainfall : वाशीम जिल्ह्यावर यंदा अति पर्जन्यकृपा

Bhojapur Canal Repair : भोजापूर कालवा पूर्ण क्षमतेने वाहणार

Urad Sowing : शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे

Nashik Heavy Rain : पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Crop Compensation Scam : खातेदारांना दिली तुटपुंजी रक्कम अन् लाटला मलिदा

SCROLL FOR NEXT