Money Lending Agrowon
ॲग्रो विशेष

Money Lending : चंद्रपूर जिल्ह्यातील २३ सावकारी परवाने रद्द

Money Lending Permission : सावकारी परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील २३ सावकारी परवाने रद्द करण्यात आले आहे.

Team Agrowon

Chandrapur News : सावकारी परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील २३ सावकारी परवाने रद्द करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील ११ व्यक्ती, राजुरा तालुक्यातील ६, ब्रह्मपुरी तालुक्यातील २ तसेच भद्रावती, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यांतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असल्याचे सहकार खात्याच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये सावकारी परवाना नूतनीकरण ३१ मार्च २०२३ पूर्वी करणे बंधनकारक असते. त्यानंतर दोन महिन्यांच्या मुदतीत म्हणजे ३१ मे २०२३ पर्यंत अतिरिक्त शुल्क ५०० रुपये भरून नूतनीकरण करता येते.

मात्र त्यानंतर आलेल्या अर्जावर संबंधित सावकाराचे सहायक निबंधक, सहकारी संस्था हे अर्ज स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सावकारी परवानाशिवाय संबंधित व्यक्तींना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला जातो. सध्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने सावकारी परवाना रद्द करण्याची प्रकिया सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात असे एकूण २३ व्यक्ती असून त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे सावकाराचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे. सावकारी परवाना रद्द झालेल्या व्यक्ती : चंद्रपूर तालुक्यातील विलास पांडुरंग निखारे (गजानन महाराज मंदिर रोड, स्नेहनगर, चंद्रपूर),

विनोद नारायण अलगेरवार (हनुमान मंदिराजवळ भिवापूर रोड, चंद्रपूर), ओम हायर परचेस प्रोप्रा, शंकर वासुदेव शेंडे आणि कवलजितसिंग इंद्रजितसिंग सलूजा (चंद्रपूर), अशोक राजम येरकल (लालपेठ कॉलरी नं. १, नांदगाव रोड, चंद्रपूर),

बलविरसिंग हरभजनसिंग चड्डा (दीक्षित ले-आउट, बापटनगर, चंद्रपूर), प्रकाश सीताराम गुंटेवार (सिव्हिल लाईन, वॉर्ड क्र. १, चंद्रपूर), सरिता राजेंद्र मालू (सिव्हिल लाइन, चंद्रपूर), ईझी फायनान्स प्रोप्रा. शुभम मारोती खुसपरे (गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर), रामदेवबाबा फायनान्स प्रोप्रा. प्रशांत भास्करराव कोलप्याकवार (रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर) कृष्णा राज कृष्णन पी. कृष्णा स्वामी रेड्डी (तुकूम, चंद्रपूर) आणि नीलेश मधूकर नावकर (बगड खिडकी, चंद्रपूर). राजुरा तालुक्यातील अनिल रामभाऊ गंप्पावार (रामनगर कॉलनी, राजुरा), राजेश बंडू यशुरवार (गडी वॉर्ड क्र. १, राजुरा),

नवनीत चंद्रकांत घट्टवार (राणा वॉर्ड क्र. ५ राजुरा), अवेज शकील अन्सारी (मौलाना आझाद, राजुरा), संदीप घनश्याम पडवेकर (रमाबाई वॉर्ड, राजुरा) आणि अंकुश अरविंद्र गंप्पावार (इंदिरा नगर, राजुरा). ब्रह्मपुरी तालुक्यातील राजेंद्र श्यामसुंदर काळबांधे (मु.पो. हळदा, ता. ब्रह्मपुरी) आणि हनुमंतराव मोनाजी राऊत (हळदा, ता. ब्रह्मपुरी). याशिवाय मार्गवी आनंद नायर (न्यू समठाना, भद्रावती), हमीद युसूफ शेख (मु.पो. तळोधी, ता. नागभीड), मंदा बबनराव येमुलवार (मु.पो. सिंदेवाही) आणि जयलक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा सौरभ सुभाष येल्लेवार (मु.पो. भिसी, ता. चिमूर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT