Beed News : जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ चा आढावा उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.१०) ऑनलाइन पद्धतीने घेतला. पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे मुंबईहून सहभागी झाले होते. बीड येथून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह
सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते. ऑनलाइन बैठकीत जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले. पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष २०२३- २४ अंतर्गत ४१० कोटी मंजूर असून, २८७ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यापैकी २१९ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
१४५ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, ३९ कोटी ३९ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष २०२४- २५ साठी ४०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा सादर केला. तसेच जिल्ह्याच्या विविध योजनांसाठी १४० कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्यासाठी जास्तीत- जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे वित्तमंत्री श्री. पवार यांनी आश्वासन दिले. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नारायणगड व गहिनीनाथगड येथील मंजूर कामांवरील निधी उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विनंती करण्यात आली.
अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग यांनी वर्ष २०२२-२३ अंतर्गत देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता संपूर्णपणे संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याबाबत निर्देश दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.