Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे २१ टक्के वाटप

Rabi Season : राष्ट्रीयीकृत बॅंकांना ३१२ कोटी ९० लाखाचे उद्दिष्ट असून, यापैकी १६४ कोटी ९३ लाख रुपयांचे कर्जकर्ज वितरण केले आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कर्जवाटप सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. या तीन महिन्यांत जिल्ह्यातील बँकांनी अवघे २१ टक्के पीककर्जाचे वितरण केले आहे. उर्वरित तीन महिन्यात बँका किती उद्दिष्ट गाठणार हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १२८० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ३१ डिसेंबरअखेर १४ हजार ८१ शेतकऱ्यांना २६५ कोटी चार लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. गेल्या तीन महिन्यांत अवघे २१ टक्के कर्ज वितरण झाले.

खरीप हंगामात उद्दिष्टांच्या ९४ टक्के बँकांनी कर्जवाटप केले होते. या कर्जवाटपात जिल्हा बँकेचा सर्वाधिक १२० टक्के वाटा आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकानी ७६ टक्के व खासगी बँकांनी उद्दिष्टाच्या ४९ टक्के वितरण केले होते. मात्र रब्बी हंगामात या बँकांनी कर्ज वाटप गार्भीयांने घेऊन उद्दिष्टांच्या ५३ टक्के कर्ज वितरण केले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांना ३१२ कोटी ९० लाखाचे उद्दिष्ट असून, यापैकी १६४ कोटी ९३ लाख रुपयांचे कर्जकर्ज वितरण केले आहे. तर खासगी बॅंकाना १६५ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट असून, यापैकी ८८ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जकर्ज वितरण केले आहे.

जिल्हा बँकेचे उद्दिष्टाच्या एक टक्का वितरण

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस ८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी या बँकेने ११ कोटी ७८ लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या एक टक्के कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन तीन महिने उलटले. कर्ज वितरणाची मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्जवाटप होईल, हे पाहावे कर्ज वितरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT