Minister Uday Samant Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Uday Samant : प्रादेशिक कार्यालयास २१ कोटी

एमआयडीसीसाठी धुळे शहरालगत रावेर येथील सुमारे ९८ हेक्टर अतिरिक्त जमीन तत्काळ अधिग्रहीत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

Team Agrowon

Dhule News : येथील अवधान शिवारातील एमआयडीसीच्या (MIDC) प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी २१ कोटी, तसेच अग्निशमन यंत्रणा, रूग्णवाहिकेसाठी (Ambulance) आणखी १३ कोटींचा भरीव निधी शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती शहराचे आमदार फारूक शाह (MLA Farooq Shah) यांनी दिली.

ते म्हणाले, एमआयडीसीच्या येथील प्रादेशिक कार्यालयासाठी २१ कोटी, तसेच फायर स्टेशनसाठी साडेसहा कोटींचा निधी नाशिक विभागीय आढावा बैठकीवेळी मागितला होता. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली होती.

यात एमआयडीसीसाठी धुळे शहरालगत रावेर येथील सुमारे ९८ हेक्टर अतिरिक्त जमीन तत्काळ अधिग्रहीत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यासाठी पाठपुरावा सुरू होता.

तत्पूर्वी, वनमंत्र्यांच्या दालनातही झालेल्या बैठकीत या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा रेटून नेला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जमीन अधिग्रहण करण्याचे जाहीर करत विकासाचा मुद्दा सोडविला होता.

एमआयडीसीचे खानदेशसाठी स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय धुळे एमआयडीसीत आहे. या वास्तूत तीन जिल्ह्यांचा कार्यभार सांभाळला जात असताना सुटसुटीत काम करण्यास अडचण येत आहेत.

त्यामुळे स्वतंत्र व सुसज्ज प्रादेशित कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधीची मागणी केली. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांना तत्काळ निर्णय घेत एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयासाठी २१ कोटी, तसेच फायर स्टेशन इमारत, दोन अग्निशमन बंब आणि रुग्णवाहिकेसाठी १३ कोटींचा निधी मंजुर केला आहे, असे आमदार शाह यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Water Storage: सोलापूर जिल्ह्यातील तलावांत ठणठणाट; रब्बीची चिंता वाढली

Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी

Umed Mall: सांगली जिल्ह्यास ‘उमेद मॉल’ मंजूर

Women Farmer Certificate: प्रत्यक्ष शेतीकामे करणाऱ्या महिलांना ‘शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT