VNMKV Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ला चार प्रकल्पांसाठी २१ कोटी मंजूर

National Agricultural Development Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हिवाय) अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ४ नवीन संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हिवाय) अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ४ नवीन संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी एकूण २१ कोटी रुपयांवर निधी मंजूर केला आहे.

या प्रकल्पांत शेतकरी सहभागातून शाश्वत व नैसर्गिक शेतीसाठी सूक्ष्मजीव तसेच यांत्रिक उपाययोजना संशोधन प्रकल्प, उती तपासणीव्दारे पिकांमधील पोषणमूल्य कमतरता निदान, प्रगत वनस्पती विश्लेषण प्रयोगशाळा, लिंबूवर्गीय पिकांच्या शाश्वत विकासासह हरित व्यवस्थापन कृती कार्यक्रम, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनासाठी कीटकनाशकांचे अवशेष विश्लेषण प्रयोगशाळा यांचा समावेश आहे.

गुरुवार (ता.२२) ते सोमवार (ता.२६) या कालावधीत काढलेल्या शासन निर्णयाव्दारे निधी खर्चास मंजुरी देण्यात आली. शेतकरी सहभागातून नैसर्गिक शेतीसाठी सूक्ष्मजीव आणि यांत्रिक उपाययोजना हा संशोधन प्रकल्प परभणी येथे राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी ३ कोटी १५ लाख ५१ हजार रुपये निधीस मंजुरी दिली आहे.

उती तपासणीव्दारे पिकांमधील पोषणमूल्य कमतरता निदान प्रगत वनस्पती विश्लेषण प्रयोगशाळा परभणी, गोळेगाव (जि. हिंगोली), नांदेड, लातूर, धाराशिव, अंबाजोगाई (जि. बीड), बदनापूर (जि. जालना), छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यास ४ कोटी २८ लाख ८४ हजार रुपये निधी मंजूर केला आहे

या चार नवीन संशोधन प्रकल्पांव्दारे शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन केले जाईल. त्यात शेतकऱ्यांचा सहभाग राहील. या प्रकल्पांतील संशोधनातून मराठवाड्यातील कृषी उद्योगांना पाठबळ मिळून शाश्वतता येईल.
डॉ. इंद्र मणी, कुलगुरू, ‘वनामकृवि’, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT