Kolhapur River Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : महापुरामुळे ऊस उत्पादकांचे २०० कोटींचे नुकसान

Sugarcane Crop Damage : महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे सहा ते सात लाख टन म्हणजेच अंदाजे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे सहा ते सात लाख टन म्हणजेच अंदाजे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस कारवाई प्रत्यक्षात केलेली दिसत नसल्याचा आरोप पूरग्रस्त समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

वर्षानुवर्षे पुरामुळे बागायत शेतकरी, रहिवासी, व्यापारी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा शास्त्रीय अहवाल तयार करावा. हा अहवाल तयार करताना पूरग्रस्त गावांतील तज्ज्ञांना अहवाल तयार करताना समाविष्ट करून घ्यावे, यासह अन्य मागण्या पूरग्रस्त समिती २०२१ पासून शासन दरबारी करत आहे.

२०२१ मध्ये १३० पूरग्रस्त गावांच्या ग्रामसभेचे ठराव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच २०२२ मध्ये लाक्षणिक उपोषण केले होते. २०२३ मध्ये पंचगंगा पुलाच्या बाजूस राष्ट्रीय महामार्गाचा भराव टाकून चाललेल्या रुंदीकरण कामांविरोधात उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर नॅशनल हायवे अधिकाऱ्यांनी भेट देऊन भरावाचे काम थांबवले होते. तसेच पुलाची शिरोली ते उचगाव उड्डाणपुलाबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवत आहे, असे जाहीर केले होते.

फेब्रुवारी २०२४ मध्ये कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे पूरग्रस्त क्षेत्रातील भरावाचे काम थांबवण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर व्यवस्थापनाच्या संदर्भात बैठक घेतली होती. पूर परिस्थितीचा शास्त्रीय अहवाल तयार करावा.

हा अहवाल तयार करताना पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांचे म्हणणे समजून घेऊन मग अहवाल तयार करावा. पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा करणाऱ्या रस्त्यावरील पूल, मोरी, पाइपची कामे सुरू करावीत, अशा मागण्याही करण्यात आल्या होत्या. पण याकडे लक्ष देण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT