Sangli Water Management agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Water Management : सांगलीकरांना दिलासा कोयनेतून विसर्ग दुप्पट, वाळणाऱ्या पिकांना आधार

Sangli Water Issue : सांगली जिल्ह्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून या टप्प्यात २ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Sangli Koyna Water : सांगली कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग काल (ता. २६) दुपारी अडीचपासून वाढवण्यात आला. २४ नोव्हेंबरपासून १०५० क्युसेकने पाणी सुरू होते. काल २१०० ने सुरू करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून या टप्प्यात २ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यात लक्ष घालावे लागले. आमदार अनिल बाबर, खासदार संजय पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर अखेर शुक्रवारपासून (ता. २४) पाणी सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात पायथ्यावरील वीज निर्मितीचे एक केंद्र सुरू करण्यात आले होते.

खासदार संजय पाटील आक्रमक

सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थितीत लोक अडचणीत असताना कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत साताराचे पालकमंत्री आडमुठेपणा करत आहेत. मात्र कोयना धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे. दान किंवा भीक देत नाही. यापुढे सांगली जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच लावण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. वेळ आली तर खासदारकी पणाला लावू, राजीनामा देऊ असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला.

खासदार संजय पाटील म्हणाले की, कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई घेत असलेल्या आडमुठ्या धोरणाचा निषेध केला. ते म्हणाले, दुष्काळी स्थितीत लोक अडचणीत असताना राजकारण करण्याच्या भूमिकेचा मी निषेध करतो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे.

दुष्काळात लोक अडचणीत असताना जिल्ह्याला वेठीस धरण्याचे काम काहीजण करत आहेत. राज्य सरकारमध्ये एकत्र काम करत असताना अशा प्रकारचे राजकारण करण्याच्या भूमिकेचा निषेध करतो.

खासदार पाटील म्हणाले, याबाबत मी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. सांगलीत कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांच्या इतिवृत्तावर सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरी आहेत. मात्र सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वाक्षरी केलेली नाही.

पाटबंधारे मंत्र्यांनी अधिकार ताब्यात घ्यावेत

कोयना धरणातून पाणी सोडण्याचे अधिकार पाटबंधारे मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताब्यात घ्यावेत. त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यात हस्तक्षेप करू नये. त्यांच्या सातबाऱ्यावर कोयना धरण नोंदलेले नाही. एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांनी त्रास देण्याची भूमिका घेतलेली आहे.

दुष्काळी स्थिती असल्याने पाणी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण जाऊन पाटबंधारे मंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी हे सगळे अधिकार स्वतःकडे घ्यावेत. आमच्या जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या माणसाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे नियोजन होऊ नये अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

SCROLL FOR NEXT