Cotton Soybean Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Anudan : कापूस, सोयाबीन अनुदानाचे ६५ लाख खातेदारांना २ हजार २४० कोटी रुपये वितरित

Anil Jadhao 

Pune News : सरकारने आतापर्यंत ५० लाख शेतकऱ्यांच्या ६५ लाख खात्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाची रक्कम जमा केली. या शेतकऱ्यांना २ हजार २४० कोटी रुपये देण्यात आले. आधार संमती दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलीआहे. सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा रखडलेली विमा भरपाई उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असेही कृषी विभागाने सांगितले. 

ज्या सरकारने खरिप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. राज्यात ९६ लाख खातेदार या अनुदानासाठी पात्र ठरले होते. मात्र त्यापैकी केवळ ६५ लाख खातेदारांनी आधार संमती दिली होती. या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. या शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार २४० कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ३१ लाख खातेदारांनी आधार संमती दिली नाही, ई-केवायसी केली नाही. त्यामुळे अनुदान वाटप रखडले आहे, असेही कृषी विभागाने सांगितले.

नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नव्हती. पण आता राज्य सरकारने भरपाईची रक्कम विमा कंपनीला दिली आहे. ही रक्कम १ हजार ९२७ कोटी रुपये एवढी आहे. या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, असे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक ७१३ कोटी रुपये मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यात ४७० कोटी रुपये कोटी, सोलापूर जिल्ह्यात २ कोटी ६६ लाख,  सातारा जिल्ह्यात २७ कोटी ७३ लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५८ कोटी ९० लाख रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे. 

तसेच फळपीकविम्याची आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहे. राज्य सरकारने आपला वमा हप्ता कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे फळपीकविम्याची ही रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होणार आहे, असेही कृषी विभागाने सांगितले.

आतापर्यंत ५० लाख शेतकऱ्यांच्या ६५ लाख खात्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा करण्यात आले. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या आधार संमतीची वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार संमती दिली नाही त्यांनी तातडीने द्यावी. त्या शेतकऱ्यांनाही अनुदान लगेच दिले जाईल. 
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT