Sugarcane Harvester Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : पाचट कपातीचे सव्वादोन कोटी परत

Team Agrowon

Latur News : सरलेल्या गळीत हंगामात मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील उसाची तोंडणी शंभर टक्के हार्वेस्टरने केली होती. यंत्राच्या साह्याने हा पहिलाच प्रयोग असल्याने ऊस तोडणी यंत्रचालक किंवा शेतकऱ्यांकडून नकळत त्यात पाचटीचे प्रमाण जास्त येऊ नये म्हणून सात टक्के रक्कम कपात करण्यात आली होती.

त्यानंतर सरकारने समिती नियुक्त करून साडेचार टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राहिलेली अडीच टक्के रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यातूनच दोन कोटी ३५ लाख २० हजार रुपये पाचट कपातीपोटी शेतकऱ्यांना देण्यात आहे.

तोडणीसाठी मजुरांचा तुटवडा भासत असल्याने व त्यांच्याकडून नेहमीच विविध कारणांमुळे ऊस तोडणीत व्यत्यय येत असल्यामुळे मांजरा कारखान्याने गेल्यावर्षी कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाची हार्वेस्टर अर्थात यंत्राच्या साह्यानेच तोडणी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर पहिल्यांदाच मांजरा साखर कारखान्याने शंभर टक्के हार्वेस्टरच्या साह्याने उसाची तोडणी करून वेगळा पायंडा निर्माण केला.

यात सुरवातीला उसाच्या वजनापैकी सात टक्के पाचटीच्या बदल्यात कपात करण्यात आले होते. गाळपास येणाऱ्या उसामध्ये पाचटाचे प्रमाण जास्त होते. त्याला आळा बसावा म्हणून कारखान्याने हा दंडक केला होता. ऊसतोडणी यंत्राद्वारे तोडणी केल्यास पाचटीपोटी किती टक्के वजन कमी करायचे, याबाबत सरकारचेही निश्चित धोरण नव्हते.

समिती स्थापन करून सरकारने साडेचार टक्के वजन कपात कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासत पाचट कपातीची जादा कपात झालेल्या अडीच टक्के वजनाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारखाना प्रशासनाने दोन कोटी ३५ लाख २० हजार रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT