Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : सोयाबीनच्या १९६ कोटी रुपयांवर ‘अग्रिम’चे वाटप

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीम बाबीअंतर्गत मंगळवार (ता. २७)पर्यंत जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ४८३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९६ कोटी ८ लाख रुपये एवढी अग्रिम पीकविमा रक्कम जमा करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीम बाबीअंतर्गत मंगळवार (ता. २७)पर्यंत जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ४८३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९६ कोटी ८ लाख रुपये एवढी अग्रिम पीकविमा रक्कम जमा करण्यात आली आहे.

अजून १६ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर १० कोटी २ लाख रुपये एवढी रक्कम जमा करणे बाकी होते. यंदाच्या जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाचा दीर्घ खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत,

सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित असल्यामुळे सोयाबीनच्या पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम विमा भरपाई जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाप्रशासनाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. विमा कंपनीनीला अधिसूचनेद्वारे दिले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर विमा कंपनीने जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांतील,

४ लाख ४१ हजार ९७० सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी २०६ कोटी ११ लाख १४ हजार रुपये एवढा २५ टक्के अग्रिम विमाभरपाई मंजूर केली आहे. जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT