Dam Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत १८८ टीएमसी पाणीसाठा

Pune Dam Water : गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांत १२५.५० टीएमसी म्हणजेच ६३ टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंद पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आत्तापर्यंत जवळपास सात धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व धरणांत मिळून १९८.३२ टीएमसीपैकी १८८.३० टीएमसी म्हणजेच ९४ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

सोमवारी (ता.१२) सकाळी आठ वाजपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सर्व धरणांत ४.२५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. या धरणातून कमी-अधिक प्रमाणात डाव्या व उजव्या कालव्याला व विद्युतगृहासाठी विसर्ग सोडण्यात आला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांत १२५.५० टीएमसी म्हणजेच ६३ टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंद पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. एक जूनपासून मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत ५५.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे.

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत नव्याने ८२.५३ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणांत नव्याने २२.०५ टीएमसी, याशिवाय उजनी ११९.०८ टीएमसी, मुळशी २८.३३ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील काही धरणे भरली असून उर्वरित काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. काही धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, मीना, कुकडी, घोड या नद्या दुथडी भरून वाहत असून, या नद्यातील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

सोमवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला धरणक्षेत्रनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर ९, वरसगाव ६, पानशेत ६, खडकवासला १, पवना १९, कासारसाई ५, कळमोडी ११, चासकमान ५, भामा आसखेड २, आंध्रा ६, वडीवळे २६, गुंजवणी ४, भाटघर २, नीरा देवघर ११, पिंपळगाव जोगे ९, माणिकडोह ६, येडगाव १, वडज ३, डिंभे ३, चिल्हेवाडी १२, मुळशी ३२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

PESA : ‘पेसा’ क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

SCROLL FOR NEXT