Pune News : खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८ शाखांतून २७ हजार ८५९ शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १८३ कोटी ८७ लाख १५ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.
यंदा तब्बल ४४ कोटी ५७ लाख रुपये जादा कर्जवाटप केले असल्याची माहिती बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
मागील वर्षी खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने २४ हजार ३८८ सभासदांना खेड तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने १८ शाखांच्या माध्यमातून १३९ कोटी २९ लाख ७७ हजार रुपयांचे खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप केले होते.
यावर्षी शासनाने जाहीर केल्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पीक प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले तालुक्यातील ६७ हजार ६७६ लाभार्थ्यांपैकी २० हजार ९६२ शेतकऱ्यांना ६७ कोटी ३८ लाख २५ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज, घर कर्ज व वाहन कर्ज व बिगरशेती कर्ज मिळून ६४ कोटी २७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी टोमॅटो, ज्वारी, बटाटा, भात आणि इतर, पिकांसाठी कर्ज वाटप केले जाते. तालुक्यात सर्वाधिक बटाटा व टोमॅटो पिकाला पीककर्ज वाटप केले आहे. बँकेचे संचालक मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी २७ हजार ८५९ शेतकऱ्यांना १९ हजर ४०८ हेक्टर क्षेत्रासाठी १८३ कोटी ८७ लाख १५ हजारांचे कर्ज वाटप झाले.
शाखानिहाय सभासद संख्या कंसात पीककर्ज वाटप :
राजगुरुनगर २७७४ (२६ कोटी २९ लाख ६७ हजार रुपये, चाकण : २६८४ (१८ कोटी ८० लाख ८५ हजार रुपये), वाडा : २१८१ (१० कोटी ९५ लाख ९ हजार रुपये), आळंदी : ७४२ (५ कोटी २३ लाख ७५ हजार रुपये), कडुस: २३७१ (१६ कोटी ७३ लाख ७८ हजार रुपये), वाफगाव २४९८ (१६ कोटी ५३ लाख २९ हजार रुपये),
पाईट : १८६४ (१५ कोटी ६८ लाख ७५ ५हजार रुपये), दावडी ८६० (४ कोटी ९४ लाख २० हजार रुपये), चास ११६८ (७ कोटी ४ लाख १५ हजार रुपये), डेहणे : ७७३ (४ कोटी ३० लाख ०८ हजार रुपये), भोसे : २३६२ (१५ कोटी ४२ लाख रुपये),
बहुळ : ११६१ (८ कोटी ०५ लाख ५० हजार रुपये), मरकळ ४१४ (२ कोटी ९६ लाख २० हजार रुपये), कुरकुंडी : १८६९ (१३ कोटी ५९ लाख २८ हजार रुपये), आंबोली : १५६३ (१० कोटी ५२ लाख ४४ हजार रुपये), शिवे : ६८८ (४ कोटी ९१ लाख ८५ हजार रुपये), पाबळ रोड : १२४२ (७ कोटी १२ लाख ३२ हजार रुपये), तळेगाव रोड ६४५ (४ कोटी ७३ लाख ९५ हजार रुपये).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.