PM Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : अखेर तारीख ठरली ; 'पीएम किसान'चा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात

PM Kisan 16th Installment : पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासंदर्भातील ही बातमी असून यामुळे राज्यासह देशातील करोडो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Mahesh Gaikwad

PM Kisan Scheme Latest Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासंदर्भातील ही बातमी असून यामुळे राज्यासह देशातील करोडो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. आता या संदर्भातील तारिख जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातीस करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हप्त्यांमध्ये दोन हजारप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे. आता योजनेच्या १६ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. होळीसणापूर्वी देशातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.

यवतमाळमधून १६ वा हप्ता वितरीत होणार

'एक्स' प्लॅटफॉर्मवरील पीएम किसान योजनेच्या अधिकृत हँडलवरून याबाबातची पोस्ट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ फेब्रूवारीला २०२४ रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. याच दिवशी यवतमाळ येथील कार्यक्रमातून मोदींच्या हस्ते योजनेचा १६ व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी १५ नोव्हेंबरला १५ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. चार महिने उलटून गेल्यानंतरही पुढील हप्त्याबाबत कोणतीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने योजनेचा १६ हप्ता कधी येणार, अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यातच आता याची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे देशभरातील सुमारे आठ कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT