Lok Sabha Election 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Lok Sabha Election Update : ज्येष्ठ नागरिक (८५ वयापुढील), तसेच ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग मतदारांचे मतदान १ ते ३ मे दरम्यान पार पडले.

Team Agrowon

Sangli News : ज्येष्ठ नागरिक (८५ वयापुढील), तसेच ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग मतदारांचे मतदान १ ते ३ मे दरम्यान पार पडले. सांगली लोकसभा मतदारसंघात या तीन दिवसांत १७९७ पैकी १६६४ मतदारांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच ज्येष्ठ व दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात या दोन्‍ही प्रकारच्या मतदारांची संख्या ६० हजार १३४ आहे. त्यापैकी ज्यांनी १२-डी अर्ज भरले, त्यातून १७९७ मतदार पात्र ठरले होते.

१६ एप्रिलपर्यंतचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सांगली लोकसभा मतदार संघात ८५ वर्षांहून अधिक वयाचे १५०२, तर दिव्यांग २९५ मतदार पात्र ठरले होते. यात सर्वाधिक मतदार जतमधून आहेत.

ज्येष्ठ ५३१, तर दिव्यांग ११० मतदारांनी नोंदणी केली होती. गृहभेटीद्वारे मतदानासाठी निवडणूक आयोगातर्फे केंद्रीय कर्मचारी असलेला एक सूक्ष्म निरीक्षक, दोन पोलिंग ऑफिसर, एक व्हिडिओग्राफर, एक पोलिस अशा १३८ टीम करण्यात आल्या होत्या. विधानसभा मतदारसंघनिहाय वाहतूक आराखडा बनवून कर्मचारी, अधिकारी रवाना केले.

विधानसभा मतदार संघ-ज्येष्ठ-दिव्यांग

मिरज १६६ ३१

सांगली २१७ ५१

पलूस-कडेगाव १८५ १७

खानापूर ६० ११

तासगाव-क.महांकाळ २७८ ७०

जत ४७५ १०७

एकूण- १३८१ २८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT