Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदार संघात शुक्रवारी (ता. २६) छाननीचा दिवस असून ५५ उमेदवार वैध घोषित झाले आहेत, तर छाननीअंती १९ उमेदवार बाद ठरले आहेत.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionAgrowon

Beed News : बीड लोकसभा मतदार संघात शुक्रवारी (ता. २६) छाननीचा दिवस असून ५५ उमेदवार वैध घोषित झाले आहेत, तर छाननीअंती १९ उमेदवार बाद ठरले आहेत. १८ ते २५ एप्रिल सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्जवाटपाची तसेच सादर करण्याची वेळ होती. या कालावधीदरम्यान एकूण ७४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते.

शुक्रवारी छाननीअंती १९ उमेदवार बाद ठरले असून, ५५ उमेदवार वैध नामनिर्देशित उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत. पंकजा गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्ष, बजरंग मनोहर सोनवणे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, सिद्धार्थ राजेंद्र टाकणकर बहुजन समाज पक्ष, अशोक भागोजी थोरात बहुजन महापार्टी, अशोक सुखदेव हिंगे वंचित बहुजन आघाडी, अंकुश रामा खोटे -भारतीय जवान किसान पार्टी, करुणा मुंडे स्वराज्य शक्ती सेना, चंद्रकांत कुमार हजारे महाराष्ट्र विकास आघाडी, जावेद सलीम सय्यद टिपू सुलतान पार्टी, ताटे महेंद्र अशोक आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टी,

Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

भीमराव जगन्नाथ दळे अखिल भारतीय परिवार पार्टी, माणिक बन्सी आदमाने बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी, मुक्ता भीमराव दळे दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल, रविकांत अंबादास राठोड समनक जनता पार्टी, शरद बहिनाजी कांबळे ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेना, शेषेराव चोखोबा वीर, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, अपक्ष वैध उमेदवार उदयभान नवनाथ राठोड, कस्पटे गणेश व्यंकटराव, गणेश नवनाथराव करांडे, गणेश भाऊसाहेब कोळेकर, गफ्फार खान जब्बार खान पठाण, गोकूळ बापूराव सवासे, गंगाधर सीताराम काळकुटे, जावेद सिकंदर मोमीन,

Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

तुकाराम विठोबा उगले, दत्ता सुदाम गायकवाड, नाजेम खान जब्बार खान पठाण, पाराजी तुळशीराम आगे, प्रकाश भगवानराव सोळंके, भास्कर किसन शिंदे, भास्कर बन्सी खांडे, मुबीन जुबेरी झहीर उल अफ्राक, मुस्तफा मैनोदिन शेख, राजेंद्र अच्युतराव होके, रासवे संतोष उत्तम, रेहमान बाहोद्दीन सय्यद, लक्ष्मीबाई बाजीराव मोरे, वचिष्ठ उद्धव कुटे, वसीम शे. सलीम शेख, विनायक तुकाराम गडदे,

शीतल शिवाजी धोंडरे, शेख एजाज शेख उमर, शेख तौसिफ अब्दुल सत्तार, शेख याशेद शेख तय्यब, श्रीराम विठ्ठलराव खळगे, सतीश पद्माकर कापसे, संमशेरखाँ साहेबखाँ पठाण, सय्यद मिनहाज अली, सलाउद्दीन खान पठाण, सलीम अल्लाबक्ष सय्यद, सादेक इब्राहिम शेख, सादेक हुसेन मोहम्मद, सारिका बजरंग सोनवणे, सुलेमान खैरोद्दिन महमद, हिदायत सादेख अली सय्यद अशी अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. २९ एप्रिल २०२४ ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com