Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Awards : नाशिकमधून १६ जणांची राज्य कृषी पुरस्कारांवर मोहोर

Agriculture Awards : राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने २०२०, २१ व २२ या तीन वर्षांतील कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Team Agrowon

Nashik News : राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने २०२०, २१ व २२ या तीन वर्षांतील कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये शेवगा पिकावर काम करणारे शहा (ता. सिन्नर) येथील बाळासाहेब मराळे यांना २०२१ चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

डाळिंब पिकात प्रयोगशीलतेने काम करणारे सातमाने (ता. मालेगाव) येथील रवींद्र पवार यांना २०२० चा, तर प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुरेश कळमकर यांना, खोरीपाडा (ता. दिंडोरी) येथील सम्राट राऊत यांना २०२१ व २२ साठीचा वसंतराव नाईक कृषीभूषण तर ‘ॲग्रोवन’चे नाशिक बातमीदार मुकुंद पिंगळे यांना २०२० साठीचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला.

कृषी क्षेत्रात महिलांसाठी महत्त्वपूर्ण जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०२१ व २२ साठी खेडगाव (ता. दिंडोरी) येथील पूनम डोखळे व चौंधाने (ता. सटाणा) येथील लक्ष्मी मोरे यांना मिळाला. २०२२ सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार जोपुळ (ता. चांदवड) येथील संदीप जाधव यांना, २०२१ उद्यान पंडित पुरस्कार ठाणगाव (ता. सुरगाणा) येथील जयप्रकाश महाले यांना, शेतीमित्र पुरस्कार भूषण निकम यांना जाहीर झाला.

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण २०२० साठी दिघवद (ता. चांदवड) ज्ञानेश्वर गांगुर्डे, २०२१ साठी मोह (ता. सिन्नर) सुनील भिसे यांना तर २०२२ करिता ढकांबे (ता. दिंडोरी) येथील दामोदर सानप व म्हैसखडक (ता. सुरगाणा) येथील रामदास देशमुख यांना जाहीर झाला. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार येवला येथील कृषी पर्यवेक्षक हितेंद्र पगार व सुरगाणातील मंडळ कृषी अधिकारी अनिल भोर यांना जाहीर झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT