Rojgar Hami Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Rojgar Hami Yojana : चाळीसगाव तालुक्यात ‘रोहयो’ची १५४३ कामे सुरू

Rojgar Hami Yojana Works Update : सद्यःस्थितीत १ हजार ५४३ कामे सुरू असून यातून २ हजार २८५ मजुरांना रोजगार मिळालेला आहे.

Team Agrowon

Chalisgaon News : चाळीसगाव तालुक्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. २६ गावांमध्ये तब्बल ३१ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. टंचाई निवारणार्थ शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध करून दिला जात आहे. ज्यामुळे दुष्काळातही मजुरांना मोठा आधार मिळत आहे. सद्यःस्थितीत १ हजार ५४३ कामे सुरू असून यातून २ हजार २८५ मजुरांना रोजगार मिळालेला आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत २४१ कामांचे मस्टर निघाले आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त ‘रोहयो’ची कामे चाळीसगाव तालुक्यात सुरू आहेत. मागीलवर्षी अपूर्ण झालेल्या पावसामुळे तालुक्यात यंदा दुष्काळाचा वणवा पेटला आहे. प्रशासनाला पावसाळ्यातच काही गावांना टँकर सुरु करावे लागले होते. टँकरची संख्या आता ३१ वर पोहचली आहे.

२६ गावांमध्ये पाणीबाणी सुरू असून काही तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने तेथे टँकर सुरू करण्याची मागणी आहे. दुसरीकडे शेतात कामे नसल्याने ग्रामीण नागरिकांना, मजुरांच्या कामे नाहीत. अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेकडो मंजूर परजिल्ह्यात ऊसतोडीसाठी होते. पावसाअभावी यंदा ऊस तोडीचा हंगाम लवकर संपला. दुष्काळात काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रशासनातर्फे कामे उपलब्ध करून दिली जात आहेत.

मजुरांना अधिकाधिक कामे उपलब्ध व्हावीत, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यात सद्यःस्थितीत १ हजार ५४३ कामे सुरु आहेत.

या कामांवर २ हजार २८५ मजुरांची उपस्थिती असल्याची माहिती पंचायत समितीच्या ‘रोहयो’ विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली. या कामांमध्ये सिंचन विहिरी, घरकुले, विहीर पुनर्भरण, सार्वजनिक शोषखड्डे, शेततळे, वर्मी कंपोस्ट, वृक्ष लागवड, संरक्षण भिंतीसह इतरही कामे केली जात आहेत. १ एप्रिलपासून मजुरीत वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT