Soil Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Testing: नांदेडला १५ मिनी माती तपासणी प्रयोगशाळा मंजूर

Nanded Agriculture: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५-२६ मध्ये नांदेड जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे.

Team Agrowon

Nanded News: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५-२६ मध्ये नांदेड जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व इच्छुकांनी आठ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

जिल्हा कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष २०२५-२६ साठी दोन लाख २२ हजार मृद नमुने ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळेकडून तपासणी करण्याबाबत वर्ष २०२५-२६ च्या राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता दिली आहे.

वर्ष २०२५-२६ चे राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुकांनी ता. आठ ऑगस्ट पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत.

ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्थसहाय्य रक्कम दीड लाख हजार रुपये आहे. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून सोडत काढून लाभार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कळसाईत यांनी केले.

१५ माती तपासणी प्रयोगशाळा 

पुणे कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या कृषी संचालकांनी नांदेड जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रयोगशाळा उभारण्यासाठी अर्थसाहाय्य खासगी व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी चिकित्सालये आणि कृषी व्यावसायिक केंद्रे, माजी सैनिक बचतगट, शेतकरी सहकारी संस्था, कृषी आवश्यक सेवा, निविष्ठा किरकोळ विक्रेते तसेच शाळा, कॉलेज, युवक-युवती यांना दिले जाणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy Projects: शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ओढा सौरऊर्जा प्रकल्पांकडे

Goras Bhandar FDA Action: ‘गोरस भंडार’वरील कारवाईवर उच्च न्यायालयाचे प्रश्‍नचिन्ह

Agricultural Schemes Funding: कृषी योजनांपेक्षा कर्मचाऱ्यांवर जादा खर्च

Agriculture Department Cadre:‘कृषी’च्या आकृतिबंधात विशिष्ट संवर्गासाठी हवे तसे बदल

Seed Multiplication Centres: तालुका बीजगुणन केंद्रे वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT