Earthquake  Agrowon
ॲग्रो विशेष

Latur Earthquake : लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे दोन वर्षांत १५ धक्के

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरात ३० सप्टेंबर १९९३ ला प्रलयकारी भूकंप झाला होता. त्यानंतर जिल्ह्याला अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतात. २०२२ आणि २३ या दोन वर्षांत भूकपांचे तब्बल १५ धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंपमापन केंद्रात झाली आहे. मात्र, चालू वर्षात भूकंपाची एकही घटना नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन भूकंपमापन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

लातूरमधील विवेकानंद चौक परिसरात बुधवारी (ता. ११) सकाळी साडेसात ते आठदरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या. त्यामुळे या भागात काहीवेळ भीतीचे वातावरण होते. भीतीपोटी काही नागरिक घराबाहेर येऊन थांबल्याचा अनुभवही प्रत्यक्षदर्शींनी सांगितला.

यासंदर्भात राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्र (नवी दिल्ली) यांच्याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने चौकशी केली. तेव्हा लातूर जिल्ह्यात असलेल्या कुठल्याही भूकंपमापन केंद्रात आजच्या भूकंपाची नोंद नाही. त्यामुळे भूकंप झाला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

२०२२ मध्ये भूकंपाच्या ११ घटना लातूर जिल्ह्यात घडल्या होत्या. या घटनांमध्ये भूकंपाची तीव्रता १.४ पासून ३.१ रिश्टर स्केलपर्यंत होती. या घटना २०२३ मध्ये कमी घडल्याची नोंद आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, पण जागरूक, सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

...तो आवाज पाण्याचा

उन्हाळ्यात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते, संपते. पाऊस झाल्यानंतर पाणीपातळीत वाढ होत राहते. पातळी भरल्यानंतर या पाण्याला बाहेर येण्याची दिशा मिळाली नाही, तर जमिनीतून पाण्याचे आवाज येत राहतात. पण, बऱ्याचदा हे आवाज भूकंपाचे आहेत, गूढ आवाज आहेत असे तर्क काढले जातात. यातून भूकंप झाल्याची अफवाही पसरत राहते. वास्तविक, अशा आवाजाची नोंद भूकंपमापन केंद्रांमध्ये होत नाही. भूकंप झाला तरच नोंद होते, अशी माहिती भूकंपमापन केंद्राचे प्रमुख आर.ए. साळुंके यांनी दिली.

...येथे आहेत भूकंपमापन केंद्र

लातूर आशिव औराद शहाजानी

भूकंपाच्या तीव्रतेचे स्वरूप

  • २ ते २.९ रिश्टर स्केल तीव्रता : हलका कंप

  • ३ ते ३.९ रिश्टर स्केल तीव्रता : मध्यम कंप

  • ४ ते ४.९ रिश्टर स्केल तीव्रता : घरातील वस्तू पडण्याइतके कंप

  • ५ ते ५.९ रिश्टर स्केल तीव्रता : कमकुवत वास्तूंचे नुकसान होण्यासारखे कंप

  • ६ ते त्यापुढील रिश्टर स्केल तीव्रता : चिंताजनक स्थिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Soybean Cotton Subsidy : अमरावतीतील ५८ हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता

Crop Damage : चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT