PM Kisan  Agrowon
ॲग्रो विशेष

PM-KISAN : गेवराईत ‘पीएम किसान’च्या हप्त्यापासून १५ हजार शेतकरी वंचित

Farmer Compensation : गेवराई तालुक्यातील जवळपास १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते जमा झालेले नाहीत. यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात गर्दी करत आहेत.

Team Agrowon

Jategaon News : पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा १६ तर महाराष्ट्र सरकारच्या नमो सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण २८ फेब्रुवारी रोजी झाले. पण, गेवराई तालुक्यातील जवळपास १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते जमा झालेले नाहीत. यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात गर्दी करत आहेत.

राज्या सराकारने नमो सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. दरम्यान, या दोन्ही योजनांचे हप्ते ता. २८ फेब्रुवारी रोजी एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. पण, तालुक्यातील ५५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी तब्बल १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्ते जमा झाले नसल्याने या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आपल्याला हप्ता का मिळाला नाही, म्हणून हे शेतकरी कृषी कार्यालयात मोठी गर्दी करत आहेत. पण, कार्यालयात अपुरे मनुष्यबळाचे कारण समोर करत याठिकाणी कर्मचारी मात्र व्यवस्थित मार्गदर्शन करत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

खाते इनॲक्टिव्ह झाले

गेवराई तालुक्यातील जवळपास १५ हजार शेतकऱ्यांचे खाते इनॲक्टिव्ह केल्याने त्यांच्या खात्यावर दोन्ही योजनांतील २ हजार रुपयांचा हप्ता पोचला नाही, ही बाब समोर आली आहे. या शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही.

ई-केवायसी पूर्ण न होणे, जिओ-व्हेरिफिकेशन किंवा बँक खात्याशी आधार लिंक न करणे ही कारणेदेखील हप्ता खात्यात जमा न होण्याची असू शकतात. त्यामुळे हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. यानंतरच त्यांना योजनेचा लाभ मिळेल, असे तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT